शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

अमेरिकेत कोरोनाबरोबरच आणखी एक मोठं संकट! असाध्य Candida Auris मुळे पसरली दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 17:47 IST

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार (सीडीसी) घातक कँडिडा ऑरिस संक्रमण झालेल्या तीनपैकी एका रुग्णाचा मृत्यू होतो.

वॉशिंग्टन - कोरोनाबरोबरच आणखीही काही नव्या आजारांनी जगात दहशत निर्माण केली आहे. आता अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी  डलास भागातील दोन रुग्णालये आणि वॉशिंग्टन डीसी (Washington DC)च्या एका नर्सिंग होममध्ये असाध्य (अनट्रिटेबल) फंगस झालेल्या रुग्णांची माहिती दिली. कँडिडा ऑरिस (Candida Auris), यिस्टचे घातक रूप आहे आणि हे गंभीर मेडिकल प्रॉब्लम असलेल्या नर्सिंग होम आणि रुग्णालयांतील रुग्णांसाठी मोठा धोका आहे. महत्वाचे म्हणजे, हे फंगस रक्तप्रवाहात संक्रमणाचे कारण ठरू शकते. एढेच नाही, तर यामुळे मृत्यूही होऊ शकतो.

सीडीसीचे मेघन रयान यांनी म्हटले आहे, की ते पहिल्यांदाच 'ग्रुप ऑफ रेझिस्टन्स' पहात आहेत, यात रुग्ण एकमेकांपासून संक्रमित होत आहेत. वॉशिंग्टन DC नर्सिंग होममध्ये आढळलेले 101 कँडिडा ऑरिसच्या समूहात तीन रुग्ण असे आहेत, ज्यांच्यावर सर्व तीन प्रकारच्या अँटिफंगल औषधांचा परिणाम झाला नाही. 

CoronaVirus News: ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर नवा धोका; कोरोनामुक्त झालेल्यांसमोर गंभीर संकट

डलास भागातील दोन रुग्णालयांत 22 कँडिडा ऑरिस प्रकरणांचे क्लस्टर रिपोर्ट करण्यात आले आहे. यांतील दोन रुग्ण मल्टीड्रग प्रतिरोधक सापडले. यानंतर सीडीसीने, हे संक्रमण रोग्यापासून रोग्यापर्यंत पसरत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. 

तीनपैकी एका रुग्णाचा होतो मृत्यू -यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार (सीडीसी) घातक कँडिडा ऑरिस संक्रमण झालेल्या तीनपैकी एका रुग्णाचा मृत्यू होतो. एवढेच नाही, तर अमेरिकन आरोग्य एजंन्सीने हा फंगल म्हणजे, जागतीक आरोग्यासाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. या फंगलवर मल्टीड्रग्सचा काहीच उपयोग होत नसल्याने CDC ही चिंतित आहे. म्हणूनच याला असाध्य असल्याचे म्हटले जात आहे. तसेच स्टँडर्ड लॅबोरेटरी पद्धतीचा वापर करून इंफेक्शनची ओळख करण्यातही अडचण येत आहे. तसेच, योग्य ओळख करता आली नाही, तर चुकीचा उपचाह होण्याचाही धोका आहे.

भयंकर, भीषण, भयावह! गेल्या 4 आठवड्यांत जगभरात 75% रुग्णांमध्ये 'डेल्टा व्हेरिएंट'; WHO चा गंभीर इशारा

संक्रमण कसे ओळखाल - गंभीर कँडिडा संक्रमण झालेल्या अधिकांश रुग्णांमध्ये आधीपासूनच कुठला ना कुठला आजार असल्याचे आढलून आले आहे. यामुळेच, एखाद्याला कँडिडा ऑरिस संक्रमण आहे की नाही, हे ओळखणे अवघड होते. CDCने दिलेल्या माहितीनुसार, ताप आणि थंडी वाजणे कँडिडा ऑरिस संक्रमणाचे सर्व सामान्य लक्षण आहे आणि संक्रमणासाठी अँटीबायोटिक उपचार करूनही लक्षणांत सुधारणा होत नाही.

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरUSअमेरिकाhospitalहॉस्पिटलmedicinesऔषधं