शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

"अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक, काही देश दहशतवादाची मदत करतायत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 22:48 IST

Afghanistan Taliban Crisis : नाव न घेता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा. UNSC च्या बैठकीत अफगाण संकटावर परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य.

ठळक मुद्दे नाव न घेता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा.UNSC च्या बैठकीत अफगाण संकटावर परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) बोलताना अफगाण संकटावर मोठं वक्तव्य केलं. काही देश दहशतवादाची मदत करत आहेत, त्यांना थांबवणं आवश्यक आहे, असं पाकिस्तानचं नाव न घेता जयशंकर म्हणाले. "दहशतवादाची प्रत्येक रूपात निंदा केली गेली पाहिजे. दहशतवादाचा कोणीही गौरव करू नये. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगानं एकत्र येणं आवश्यक आहे. दहशतवादाच्या लढाईत भारत पूर्णपणे पुढेही सहकार्य करण्यास तयार आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं. 

सध्या भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अध्यक्षस्थानी आहे. गुरूवारी या सुरक्षा परिषदेत दहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी निर्माण होत असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. "दहशतवादाला कोणताही धर्म, राष्ट्र, संस्कृती किंवा जातीय समुहाशी जोडून पाहिलं जाऊ शकत नाही. दहशतवादाचा कायम निषेध केला गेला पाहिजे," असं जयशंकर म्हणाले.  जयशंकर यांनी यावेळी कोरोनाचं उदाहरण देत म्हटलं, की जे कोरोनासाठी सत्य आहे, तेच दहशतवादासाठी सत्य आहे. जोपर्यंत सर्व सुरक्षित होणार नाहीत, तोवर कोणीही सुरक्षित राहणार नाही. अफगाणिस्तान असेल किंवा भारत, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद सारख्या दहशवादी संघटना सतत सक्रिय असल्याचंही ते म्हणाले. 

दहशतवाद्यांना बिटकॉईनच्या माध्यमातून बक्षीस एस. जयशंकर यांनी बोलताना ISIS चा उल्लेख केला. "दहशवतादी संघटना ISIS चा पाया मजबूत होत आहे. दहशतवाद्यांना जीव घेण्याच्या मोबदल्यात बिटकॉईन्स बक्षीस म्हणून दिल्या जात आहेत. तरूणांना ऑनलाइन पद्धतीनं अपप्रचार करून भटकवण्याचं काम केलं जात आहे," असंही ते म्हणाले. "जेव्हा आम्ही पाहतो की कोणाचे हात एखाद्याच्या रक्तानं रंगलेले असतील आणि त्यांचं कोणता देश स्वागत करतो, सुविधा पुरवतोय, तेव्हा आम्ही बोलण्याचं धाडस नक्कीच करतो. भारतानं भरपूर दहशतवाद सहन केला आहे. २००८ मध्ये मुंबई हल्ला, २०१६ पठाणकोट एअरबेस हल्ला. २०१९ मध्ये पुलवामा, परंतु आम्ही दहशतवादासोबत कधीच तडजोड केली नाही," असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद