आपल्या मुलानं यशाचं शिखर गाठणं हे कोणत्याही आई-वडिलांची मनापासून इच्छा असते. आपल्या मुलांनी यशाचं शिखर गाठलं म्हणजे जगातील कोणतीही लढाई आपण जिंकलो असं आई-वडिलांना वाटत असतं. असाच एक भावूक क्षण मसुरीमध्ये पाहायला मिळाला. ज्या विभागात वडील इन्स्पेक्टर म्हणून तैनात आहेत, त्याच विभागात मुलगी असिस्टंट कमांडेंट पदावर नियुक्त झाली आहे. अशातच वडिलांनी पासिंग परेडमध्ये आपल्या मुलीला सॅल्युट केलं. सोशल मीडियावर हा भावूक करणारा क्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यापेक्षा कोणतीही अभिमानाची बाब असू शकत नाही असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
फोटोंमध्ये जे सॅल्युट करताना दिसत आहेत, त्यांचं नाव कमलेश कुमार असं आहे. ते आयटीबीपीमध्ये इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आ हे. तर त्यांच्या मुलीचं नाव दीक्षा असं आहे. दीक्षाच्या बालपणापासून तिनं आयटीबीपीमध्ये यावं असं कमलेश कुमार यांना वाटत होतं. त्यांचं स्वप्न दीक्षानं पूर्ण केलं.