प्रेरणादायी! वडिल दुधविक्रेते अन् मुलीने NEET परिक्षेत पटकावला ४७ वा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:21 IST2022-02-07T18:18:20+5:302022-02-07T18:21:09+5:30
वडील दुधवाले, घराची आर्थिक परिस्थीती ढासळलेली पण ज्यापद्धतीने राखेतुन फिनीक्स पक्षी भरारी घेतो त्याप्रमाणे तिने भरारी घेतली. NEET च्या परिक्षेत देशभरात ४७वा क्रमांक पटकावला.

प्रेरणादायी! वडिल दुधविक्रेते अन् मुलीने NEET परिक्षेत पटकावला ४७ वा क्रमांक
वडील दुधवाले, घराची आर्थिक परिस्थीती ढासळलेली पण ज्यापद्धतीने राखेतुन फिनीक्स पक्षी भरारी घेतो त्याप्रमाणे तिने भरारी घेतली. NEET च्या परिक्षेत देशभरात ४७वा क्रमांक पटकावला. तिच्या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होतंय. पण याचं श्रेय तिनं तिच्या माता पित्यांना दिलंय.
हिमाचल प्रदेशच्या हरमीपुर जिल्ह्यातील बुरनाड गावाची नजिया ही मुलगी. वडिल साहदिन आणि आई नुसरत हे तिचे आईवडिल. वडिल दुधविक्रीचे काम करतात. नजियाला ६ बहिणी आहेत. त्यातील नजिया सर्वात मोठी. पण नजिया घरची जबाबदारीही लीलया पार पाडते. नजियाचे प्राथमिक शिक्षण राज्याच्या प्राथमिक पाठशाला बन्न येथे झाले आहे. नजियाने राज्याच्या माध्यमिक महाविद्यालत १२ वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. त्यात तिचा प्रथम क्रमांक आला होता.
त्यानंतर तीने बीएएमसला प्रवेश घेतला. त्याचा अभ्यास सुरु असताना तिनं NEETचीही तयारी सुरु ठेवली. २०२० साली झालेल्या परिक्षेत नजियाने ४७ वा क्रमांक पटकावला. तसेच अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विभागात ५ वा क्रमांक पटकावला. तिने ४ फेब्रुवारी रोजी बिसालपूरमध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला. तिला बीएएमएसचं शिक्षण अर्धवट राहिल्याबद्दल खंत व्यक्त केली पण एमबीबीएसचा दाखला मिळाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला आहे. सर्व स्तरातून नजियाचे कौतुक होत आहे.