कडक सॅल्यूट! प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश केले, त्याच रेल्वे स्टेशनवर ३५ वर्षांनी 'तो' झाला अधीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:58 IST2025-01-22T12:57:27+5:302025-01-22T12:58:40+5:30
रेल्वेमध्ये नोकरी मिळण्यापूर्वी, नोकरी शोधताना त्यांना अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं.

कडक सॅल्यूट! प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश केले, त्याच रेल्वे स्टेशनवर ३५ वर्षांनी 'तो' झाला अधीक्षक
राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्डाचे अध्यक्ष आणि सैन्यात सेवा बजावलेले निवृत्त मेजर जनरल आलोक राज यांनी सोशल मीडियावर एक अतिशय प्रेरणादायी गोष्ट शेअर केली. स्थानिक दैनिक वृत्तपत्रात प्रकाशित झालेली ही गोष्ट गज्जू म्हणजेच गजेसिंह यांची आहे ज्यांनी संघर्ष केला आणि यशाच्या शिखरावर पोहोचले. आज ते त्याच रेल्वे स्टेशनचे अधीक्षक झाले आहेत जिथे ते एकेकाळी बूट पॉलिशिंगचं काम करायचे. रेल्वेमध्ये नोकरी मिळण्यापूर्वी, नोकरी शोधताना त्यांना अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं.
एका रिपोर्टनुसार, गजेसिंह राजस्थानमधील ब्यावर रेल्वे स्टेशनचे अधीक्षक बनले आहेत, त्याच स्टेशनवर ते ३५ वर्षांपूर्वी गज्जू नावाने बूट पॉलिशिंगचं काम करत होते. गजेसिंह यांच्याकडे लहानपणी पुस्तके खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून ते त्यांच्या बालपणीचा मित्र मुरलीसोबत पुस्तकं खरेदी करायचे आणि पुस्तकं फाडून दोन तुकडे करायचे आणि दोघे ते एक-एक करून वाचायचे.
कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी, गजेसिंह शाळेतून आल्यानंतर इतर मुलांसह बूट पॉलिशचा एक बॉक्स आणि दोन ब्रश घेऊन रेल्वे स्टेशनवर पोहोचायचे आणि दररोज प्रवाशांचे बूट पॉलिश करायचे, ज्यामुळे त्यांना दररोज २०-३० रुपये मिळत असत. यानंतर आणखी पैसे कमवण्यासाठी त्यांनी बँड सदस्यांसोबत बँड वाजवण्यास सुरुवात केली ज्यासाठी त्यांनी ५० रुपये मिळाले.
गजेसिंह यांनी २५ वेळा स्पर्धात्मक नोकरी परीक्षा उत्तीर्ण केली परंतु अनेकदा मुलाखतींमध्ये ते नापास झाले. त्याने कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, सीपीओ सब इन्स्पेक्टर आणि एसएससी अशा स्पर्धा परीक्षा दोनदा दिल्या आहेत. सहाय्यक स्टेशन मास्टरसाठी रेल्वे भरती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांना २००८ मध्ये बिकानेर, वीरदवल-सुरतगड येथे स्टेशन मास्टर म्हणून पहिलं पोस्टिंग मिळालं. ३५ वर्षांनंतर, ते त्याच स्टेशनवर अधीक्षक झाले जिथे ते बूट पॉलिशिंगचं काम करायचे.