शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मातीतून सोने उगवले, लाखो रुपये वर्षाला कमवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:16 IST

‘दिलपसंद’ मिळवून देणार चार महिन्यात 60 लाख

बाळासाहेब काकडे/विजयकुमार गाडेकरश्रीगोंदा (जि. अहमदनगर) : तालुक्यातील २५ शेतकऱ्यांनी ढेमसे (दिलपसंद) या वेलवर्णीय पिकाची सामूहिक लागवड केली. सध्या त्याची विक्री सुरू असून शंभर रुपये किलो दर मिळत आहे. या हिशेबाने पुढील चार महिन्यात ५० ते ६० लाखांच्या उलाढालीची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

२० शेतकऱ्यांनी लागवड केली. १५ ते २० मेट्रिक टन एकरी उत्पादन निघणार आहे. पिकाला २५ ते १०० रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. एकरी दीड ते दोन लाखांची कमाई होणार आहे. हे ढेमसे पुणे, मुंबईत भाव खात आहेत.

ढेमशाचे पीक घेण्यास घरच्यांचा विरोध होता; मात्र राहुल पोळ यांनी प्रोत्साहन दिले. आम्ही २० शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने ही शेती केली. त्यामुळे मार्केटिंगचे काम सोपे झाले. चार महिन्यात दीड ते दोन लाखांचे उत्पादन अपेक्षित आहे.- ओंकार पोटे, शेतकरी.

श्रीगोंद्यातील शेतकरी फळबागा आणि ऊस शेतीस प्राधान्य देतात; मात्र काळाच्या ओघात कमी कालावधीतील पिके घेण्यासाठी पुढे येत आहेत. यातूनच ढेमशाची सामूहिक लागवड करण्यात आली. - राहुल पोळ, कृषी मार्गदर्शक, श्रीगोंदा

खडकाळ जमिनीवरही दरवळला ‘केशरा’चा सुगंध

शिरूर कासार  (जि. बीड) : ‘ओले मूळ भेदी खडकाचे अंग’ या अभंगाची प्रचीती शिरूर सुतारनेट येथे राहणारे प्रगतिशील शेतकरी दाम्पत्य केशरबाई आणि पांडुरंग कातखडे यांनी दाखवली आहे. कातखडे यांनी अर्धा एकर शेतीवर केशर आंब्याची बाग फुलविली आहे. विशेष म्हणजे ही जमीन पूर्णपणे खडकाळ असून, विहिरीचे पाणी ठिबक पद्धतीने देऊन बागेला बहर आणला आहे. २०१७ मध्ये राहुरी येथील कृषी विद्यापीठातून तुकाराम कातखडे यांनी  केशर आंब्याची ५० झाडे आणली होती. दोन बाय दोन  खड्डा घेऊन पंधरा फुटांवर या झाडांची लागवड केली. रोगराईचा धोका लक्षात घेऊन दोन वेळा फवारणीदेखील केली. 

पाच वर्षांनी झाडांना फळे लगडली असून, एका झाडाला सरासरी शंभर ते दीडशे कैरी दिसून येत आहे. गतवर्षी १५ ते २० हजार रुपयांची उलाढाल झाली. यावर्षी उत्पन्न वाढीची शक्यता आहे. 

केशर आंब्याला मोठ्या प्रमाणावर गोडी असल्याने ग्राहकांची पसंती कायमच असते. गतवर्षी रोगराई आणि अवकाळी पावसामुळे उत्पन्नावर थेट परिणाम झाला. यावर्षी बहर चांगला असून, रोगराईची शक्यता वाटत नाही. यंदा चांगला भाव मिळू शकतो. - पांडुरंग कातखडे, शेतकरी, शिरूर.