शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

Lokmat Infra Conclave: समृद्धी महामार्गाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, दोन महिन्यांत खुला होणार मोठा टप्पा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 12:24 IST

केवळ नागपूरपर्यंत समृद्धी महामार्ग थांबवायचा नाही, गडचिरोलीपर्यंत पोहोचवायचाय : एकनाथ शिंदे

"सध्या आपण अनेक महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प करत आहोत. आपण २०२५ मध्ये महाराष्ट्र कसा असेल यापेक्षा आपण पुढील २० ते २५ वर्षांमध्ये महाराष्ट्र कसा असेल याचं व्हिजन ठेवलं पाहिजे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महत्त्वाचा महामार्ग आहे. ७०० किलोमीटरच्या या महामार्गांतील शिर्डी नागपूर हा महामार्ग पुढील दोन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. या महामार्गावर आम्ही ग्रीन बेल्टही तयार केला आहे. तसंच महामार्ग केवळ नागपूरपर्यंत न ठेवता गोंदीया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पोहोचवायचा आहे. नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसून त्या ठिकाणी विकासाची गंगा पोहोचवायची आहे," असं मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.लोकमततर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह' 'महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप' या कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. बुधवारी मुंबईत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. "सध्या महाराष्ट्रात अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरू आहेत. २०२५ मध्ये महाराष्ट्रात कसा असेल हे व्हिजन ठेवण्यापेक्षा पुढील २०-२५ वर्षांत महाराष्ट्र कसा असेल असं व्हिजन ठेवलं पाहिजे. ब्रिटिश गेले पण त्यांनी उभारलेल्या वास्तू आजही तशाच आहेत. त्यामुळे त्यांचं तेव्हाचं व्हिजन काय अशा अनेक गोष्टी आत्मसात करू शकतो," असंही शिंदे म्हणाले. "मुंबई एमएमआर महत्त्वाचा भाग आहे. शहरीकरण वाढलंय, गरजा वाढल्यात, रस्ते, कोस्टल रोड, वांद्रे वर्सोवा सिलिंक, मुंबई शिवडी ट्रान्सहार्बर असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. मुंबई, नवी मुंबई, रायगड हे तीन जिल्हे आपण जोडतोय. समृद्धी महामार्ग ७०० किमीचा रस्ता. पुढील दोन महिन्यांमध्ये शिडी नागपूर महामार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. महामार्गांवर ग्रीन बेल्ट तयार केला आहे. तसंच पर्यावरणाची आम्ही काळजी घेतली आहे. वन्यजीवांचीही काळजी घेतली आहे. वन्यजीवांना ये-जा करण्यासाठी अंडरपास केला आहे," असंही त्यांनी नमूद केलं. स्टँप ड्युटी कमी करण्याच्या निर्णयाचा फायदाएमएमआरडीए मोठं काम करतंय. येत्या काळात मेट्रोचं जाळंही बदलापूर्यंत नेण्याचे विचार सुरू आहेत. आज सिडको आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारतंय. राज्यात अनेक पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. भविष्यात याचा सर्वांना फायदा होईल. ज्या देशाचे जिल्ह्याचे रस्ते चांगले त्यांची प्रगती अधिक होते. सर्व विभाग मोठी काम करतायत. घरं बांधतायत हे सर्व आपण विकासासाठी करत आहोत. महसूल विभागही आम्हाला तितकं महत्त्वाचं आहे. लोकांना स्टँप ड्युटी आणि रजिस्ट्रेशनमध्ये सवलत दिली पाहिजे असं वाटतं. कोरोना काळात दिलेल्या सवलतीमुळे मोठं नुकसान होईल, असं लोकांना वाटलं होतं. परंतु तसं काही झालं नाही. रिअल इस्टेट महत्त्वाचा विभाग आहे. रिअल इस्टेटला आम्ही ऑक्सिजनही दिला आणि बुस्टर डोसही दिला. शेतीनंतर या क्षेत्रात लाखो लोक काम करतायत. सर्वसामान्य लोकांनाही या निर्णयाचा खुप फायदा झाला असल्याचंही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गEknath Shindeएकनाथ शिंदेLokmatलोकमत