शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Tokyo Olympics: ऐतिहासिक! भारताने ४१ वर्षांनंतर हॉकीमध्ये जिंकले पदक, जर्मनीला नमवून केला कांस्य पदकावर कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 8:53 AM

Tokyo Olympics Live Updates: आज जर्मनीविरुद्ध झालेल्या कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत भारताने ५-४ असा विजय मिळवत कांस्यपदकावर कब्जा केला.

टोकियो - यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त खेळ करणाऱ्या भारतीय हॉकी संघाने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज जर्मनीविरुद्ध झालेल्या कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत भारताने ५-४ असा विजय मिळवत कांस्यपदकावर कब्जा केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भारतीय संघ एकवेळ १-३ असा पिछाडीवर पडला होता. मात्र या पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत भारताने ५-३ अशी आघाडी घेतली आणि अखेरीस ५-४  अशा फरकाने विजय मिळवसा भारतीय हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. आज झालेल्या लढतीत सिमरनजीत सिंगने दोन आणि हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या या ऐतिहासिक यशात मोलाचा वाटा उचलला. 

पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीने जोरदार सुरुवात केली. पहिल्याच मिनिटाला जर्मनीने गोल करून या महत्त्वपूर्ण लढतीत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीने पूर्ण वर्चस्व राखले. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस जर्मनीला एकापाठोपाठ एक पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र भारतीय संघाने भक्कम बचाव करत हे हल्ले हाणून पाडले. दरम्यान, दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक सुरुवात करत जर्मनीवर प्रतिहल्ला केला. यादरम्यान १७ व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने गोल करून भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मात्र २४ व्या मिनिटाला निकोलस वेलनने गोल करून जर्मनीला पुन्हा आघाडी मिळवून दिली. तर काही वेळातच २५ व्या मिनिटाला प्युक्सने गोल करून जर्मनीची आघाडी ३-१ अशी वाढवली. मात्र भारताने जर्मनीवर पुन्हा प्रतिहल्ला केला. २७ व्या मिनिटाला हार्दिक सिंगने गोल करून भारताची पिछाडी २-३ अशी कमी केली. तर २९ व्या मिनिटाला  हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. मध्यांतराला दोन्ही संघ ३-३ अशा बरोबरीत होते. मध्यांतरानंतरच्या खेळात भारताने पुन्हा आक्रमण करून जर्मनीवर दबाव वाढवला. यादरम्यान, रुपिंदरपाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर सिमरनजीत सिंगने गोल करून भारताची आघाडी ५-३ अशी वाढवली. त्यानंतर तिसरा क्वार्टर संपेपर्यंत भारताने ही आघाडी कायम राखली. दरम्यान, चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने पुन्हा एकदा भारतावर प्रतिहल्ला करत चौथा गोल केला.  मात्र त्यानंतर भारतीय संघाने भक्कम बचाव केला. यादरम्यान भारतीय संघाला गोल करता आला नाही. मात्र जर्मनीचे आक्रमण थोपवत भारताने ५-४ अशी आघाडी अखेरपर्यंत कायम राखली आणि विजय साकारला. 

टॅग्स :Indiaभारतindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021