आयओएकडून २ वर्षांत कोणतेही कार्य नाही, भारतातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्याच्या प्रयत्नात - नरेंद्र बत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 02:50 AM2017-11-19T02:50:52+5:302017-11-19T06:44:18+5:30

फाईव्ह अ साईड (मिक्स हॉकी) हॉकी आयोजित करण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये प्रत्येक गावात आणि शहरात प्रत्येक युवक-युवतीने हॉकी खेळावे आणि आपल्या देशातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

There is no work from IOA in 2 years, trying to bring India's earlier hockey days - Narendra Batra | आयओएकडून २ वर्षांत कोणतेही कार्य नाही, भारतातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्याच्या प्रयत्नात - नरेंद्र बत्रा

आयओएकडून २ वर्षांत कोणतेही कार्य नाही, भारतातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्याच्या प्रयत्नात - नरेंद्र बत्रा

Next

- शिवाजी गोरे

पुणे : फाईव्ह अ साईड (मिक्स हॉकी) हॉकी आयोजित करण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये प्रत्येक गावात आणि शहरात प्रत्येक युवक-युवतीने हॉकी खेळावे आणि आपल्या देशातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गेल्या दोन वर्षांत भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) विविध स्पर्धांना संघ पाठविण्याच्या व्यतिरिक्त सध्याचे असलेले अध्यक्ष यांनी कोणतेही कार्य केलेले नाही, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
राष्ट्रीय फाईव्ह अ साईड हॉकी स्पर्धेच्या निमित्ताने बत्रा पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, फाईव्ह अ साईड हॉकी मिक्स ठेवण्याचा उद्देश असा आहे की काही वेळेस पुरुष चांगले खेळतात त्यावेळी महिलांचा खेळ होत नाही. या स्पर्धेमुळे पुरुषांबरोबर खेळून महिलांच्या खेळामध्येसुद्धा सुधारणा करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. पुरुष व महिला एकत्र खेळल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासही वाढविण्यास मदत होईल. यामुळे शालेय मुला-मुलींमध्ये हॉकी खेळाची लोकप्रियता वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल. यासाठी मोठ्या मैदानाची आवश्यकता नाही. ही शाळेतील, महाविद्यालयांतील लहान उद्यानांसह आपल्या सोसायटीमध्येसुद्धा खेळता येणार आहे.

- भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असलेले बत्रा यांना पुढील महिन्यात होणाºया निवडणूकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याबाबत मी आत्ताच काही सांगू शकत नाही. २७, २८, २९ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे. २९ तारखेला आपल्याला कळेलच की कोण-कोण कोणत्या कोणत्या पदासाठी उमेदवारी अर्ज भरेल.
- गेल्या दोन वर्षांत विविध स्पर्धांना संघ पाठविण्याच्या व्यतिरिक्त कोणतेही कार्य झालेले नाही.
- भारतीय आॅलिम्पिक संघाच्या माध्यमातून देशामध्ये जास्तीत जास्त क्रीडा संस्कृती टिकविण्यासाठी अनेक उपाययोजना करता येऊ शकतात पण याबाबतीत काहीही झालेले नाही. त्यामुळे त्या समितीवर योग्य नियोजन व अचूक निर्णय घेणारीच व्यक्तीच यायला हवी.


राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा उद्देश असा आहे की, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त हॉकीचे खेळाडू (मुले-मुली) तयार व्हावीत आणि त्यांनी भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करावे. फाईव्ह अ साईड हॉकीमुळे शालेय मुला-मुलींना हॉकीचा आनंद नक्कीच लुटता येणार आहे. त्यामाध्यमातून महाराष्ट्रामध्येसुद्धा पूर्वीचे हॉकीचे दिवस येतील असा आम्ही प्रयत्न करणार आहे. यामुळे हॉकीची लोकप्रियता पुन्हा वाढेल. औरंगाबादमध्ये आम्ही घेतलेल्या बैठकीमध्ये काही निर्णयसुद्धा घेतले आहेत की ज्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये हॉकीची मैदाने तयार होतील. लेटस ब्रिंग बॅक द ओल्ड ग्लोरी हे आम्ही महाराष्ट्राचे ब्रीद वाक्य केले आहे. - हितेश जैन, अध्यक्ष हॉकी महाराष्ट्र

Web Title: There is no work from IOA in 2 years, trying to bring India's earlier hockey days - Narendra Batra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी