शहरं
Join us  
Trending Stories
1
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
2
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
3
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
4
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
5
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
6
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
7
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
8
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
9
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
10
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
11
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
13
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
14
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
15
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
16
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
17
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
18
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
19
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
20
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव

National sports day: आॅलिम्पिक सुवर्णयुगाचे शिल्पकार मेजर ध्यानचंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 10:54 IST

अफलातून खेळामुळे बनले हॉकीचे जादूगार

भारतीय क्रीडाक्षेत्राचे नाव जगाच्या नकाशावर नेणारे दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची बुधवारी जयंती. त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करून हॉकीच्या या जादुगाराला देशभर मानवंदना देण्यात येते. इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध झालेल्या एका सामन्यात मेजर ध्यानचंद यांच्या स्टिकबरोबरच पळणारा चेंडू पाहून त्यांच्या हॉकीस्टिकला चुंबकासारखा काही प्रकार तर लावला नाही ना याची तपासणी करण्यात आली होती. तालबद्ध हालचाली, नजरेत भरणारे फुटवर्क आणि चेंडूवरील जबरदस्त हुकूमत त्हेच त्यांच्या यशाचे खरे गमक होते आणि त्यामागे होते प्रचंड कष्ट आणि नियमित सराव. त्यांच्या अफलातून खेळामुळेच त्यांना हॉकीचे जादुगर म्हटले जाते.मेजर ध्यानचंद यांचा जन्म प्रयाग (इलाहाबाद) येथे २९ आॅगस्ट १९०५ रोजी झाला होता. सहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर १९२२ मध्ये ध्यानचंद सैन्यदलात भरती झाले. तो पर्यंत त्यांच्या मनामध्ये हॉकीविषयी रुची नव्हती. मात्र, त्यानंतर त्यांनी इतिहास घडविला.

१९३२ साली लॉस एंजिलिस येथे झालेल्या आॅलिम्पिकमध्ये भारताने दुसरे सुवर्ण जिंकले. या स्पर्धेत भारतातर्फे २४ गोल नोंदविले गेले होते. त्यापैकी ८ गोल ध्यानचंद यांनी नोंदविले होते. ‘द गोल’ या आपल्या पुस्तकामध्ये १९३६ च्या आॅलिम्पिक स्पर्धेची चर्चा करताना ध्यानचंद यांनी लिहिले की, अकराव्या बर्लिन आॅलिम्पिकमधील हॉकीचा अंतिम सामना जर्मनीविरुद्ध दि. १४ आॅगस्टला होणार होता. परंतु पाऊस आल्यामुळे हा सामना १५ आॅगस्टला खेळला जाणार होता. भारतीय खेळाडूमध्ये जर्मनीच्या खेळाडू विषयी दहशत निर्माण झाली कारण सराव सामन्यामध्ये यापूर्वी जर्मनीने १-४ ने हरविले होते. १५ आॅगस्टला आम्ही सर्व खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये एकत्र झालो. सर्व खेळाडूंच्या समोर ठेवलेला तिरंगा झेंडा जणू काही आम्हाला सांगत होता की, आता माझी लाज तुमच्या हातामध्ये आहे. आम्ही वीर सैनिकाप्रमाणे मैदानात उतरलो आणि ८-१ ने विजयी झालो, त्यादिवशी खरोखरच तिरंग्याची लाज राखली गेली. त्यावेळी कोणाला कल्पनाही नव्हती, की पुढे १५ आॅगस्टच भारताचा स्वातंत्र्य दिन ठरेल.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ