आॅस्ट्रेलिया हॉकी लीगसाठी भारत ‘अ’ महिला संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 03:51 AM2017-09-20T03:51:51+5:302017-09-20T03:51:53+5:30

आॅस्ट्रेलिया हॉकी लीग (एएचएल) साठी हॉकी इंडियाने १८ जणांच्या भारत ‘अ’ महिला संघाची घोेषणा केली. २८ सप्टेंबरपासून ‘एएचएल’ला प्रारंभ होणार आहे.

India 'A' women's team for the Australia Hockey League | आॅस्ट्रेलिया हॉकी लीगसाठी भारत ‘अ’ महिला संघ जाहीर

आॅस्ट्रेलिया हॉकी लीगसाठी भारत ‘अ’ महिला संघ जाहीर

Next

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलिया हॉकी लीग (एएचएल) साठी हॉकी इंडियाने १८ जणांच्या भारत ‘अ’ महिला संघाची घोेषणा केली. २८ सप्टेंबरपासून ‘एएचएल’ला प्रारंभ होणार आहे.
संघाच्या कर्णधारपदी प्रीती दुबेची निवड करण्यात आली असून, उदिताकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. दिव्या थेपे व बिचू देवी गोलरक्षक असतील. निलू दादिया, अस्मिती बार्ला, प्रियंका, सुमन देवी थोडम व सलिमा टेटे बचाव फळी सांभाळणार आहेत. मधल्या फळीत उदिता, इशिका चौधरी, महिमा चौधरी, गगनदीप कौर, निलांजली राय, मारियाना कुजूर यांचा समावेश आहे. आघाडीची जबाबदारी कर्णधार प्रीती, संगीता कुमारी, नवप्रीत कौर, मुमताज खान यांच्यावर असणार आहे. भारत प्रथमच ‘एएचएल’मध्ये सहभागी होणार आहे. या स्पर्धेत भारतासह क्विन्सलॅँड, व्हिक्टोरिया, नॉर्दर्न टेरिटरी, दक्षिण आॅस्ट्रेलिया, पश्चिम आॅस्ट्रेलिया, न्यू साऊथ वेल्स, टास्मानिया, कॅपिटल टेरिटरी, न्यूझीलंड डेव्हलपमेंट हे देश सहभागी होणार आहेत.

Web Title: India 'A' women's team for the Australia Hockey League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.