शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भारताने उडवला पाकचा धुव्वा; आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी; अव्वल स्थानासह केला उपांत्य फेरीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 05:44 IST

शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत भारतीय संघ जपानच्या आव्हानाला सामोरे जाणार असून, अन्य उपांत्य सामन्यात मलेशिया आणि दक्षिण कोरिया एकमेकांविरुद्ध भिडतील.

चेन्नई : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपल्या अखेरच्या राउंड रॉबिन सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-० असा फडशा पाडला. या दिमाखदार विजयासह भारताने सर्वाधिक १३ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी, या पराभवासह पाकिस्तानची पाचव्या स्थानी घसरण झाली आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत भारतीय संघ जपानच्या आव्हानाला सामोरे जाणार असून, अन्य उपांत्य सामन्यात मलेशिया आणि दक्षिण कोरिया एकमेकांविरुद्ध भिडतील. मेजर राधाक्रिष्णन स्टेडियमवर भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. चाहत्यांकडून मिळालेल्या या जबरदस्त पाठिंब्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वासही दुणावला. पेनल्टी कॉर्नरची कमजोरी दूर ठेवत भारतीयांनी चारपैकी तीन गोल पेनल्टी कॉर्नरवरच नोंदवत आपला जलवा दाखवून दिला. या सामन्याआधीच उपांत्य फेरी निश्चित केल्याने भारतीय संघाने आत्मविश्वासाने सुरुवात करताना पाकिस्तानवर सुरुवातीपासून दडपण आणले. 

कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. त्याने १५व्या आणि २३व्या मिनिटाला गोल करत भारताला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर जुगराज सिंगने ३६व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नवर गोल केला. दडपणाखाली आलेल्या पाकिस्तानकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत आकाशदीप सिंगने ५५व्या मिनिटाला शानदार मैदानी गोल करत भारताचा विजय निश्चित केला.

जपानचा चीनला धक्काजपानने चीनचा २-१ असा पराभव उपांत्य फेरी गाठली. चौथ्या स्थानासाठी त्यांना भारताचा पाकविरुद्ध मोठा विजय आवश्यक होता. जपानकडून यामाडा शोटा (८वे मिनिट) व फुकुडा केंटारो (५४) यांनी गोल केला. चीनकडून आओ सुओझूने (५७)गोल केला. मलेशियाने द. कोरियाला १-० असे नमवले. मलेशियाच्या अझराई-अबु-कमलने गोल केला.

टॅग्स :Hockeyहॉकी