शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

वर्चस्व कायम राखण्यास भारत उत्सुक, सुपर फोर फेरीत पाकिस्तानविरुद्ध लढत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 3:01 AM

कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाला शनिवारी १० व्या पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेत सुपर फोरच्या तिस-या व अखेरच्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

ढाका : कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाला शनिवारी १० व्या पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेत सुपर फोरच्या तिस-या व अखेरच्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत विजय मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे.अलीकडची कामगिरी व वर्चस्व याचा विचार करता स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघ १३ व्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानविरुद्ध प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करणार आहे. अलीकडच्या कालावधीत भारताने पाकिस्तानविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. मनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखालील संघ शेजारी राष्ट्राच्या संघावरील मजबूत पकड कायम राखण्यास प्रयत्नशील आहे.सुपर फोरच्या पहिल्या लढतीत कोरियाविरुद्ध १-१ ची बरोबरी वगळता भारतीय संघाने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी काही शानदार मैदानी गोल नोंदविले असून भारतीय संघाने लौकिकाप्रमाणे ‘वन टच’हॉकीचे प्रदर्शन केले आहे.कोरियाविरुद्धची लढत भारतीय संघाला सावध करण्यासाठी पुरेशी होती. भारतीय संघ नवे मुख्य प्रशिक्षक सोर्ड मारिने यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली स्पर्धा खेळत आहे. कोरियाविरुद्धचा अनिर्णीत निकाल भारतीय संघाला इशारा देण्यास पुरेसा ठरला. गुरुवारी खेळल्या गेलेल्या सुपर फोरच्या दुसºया लढतीत भारताने चमकदार कामगिरी करीत मलेशियाचा ६-२ ने पराभव केला. भारतीय संघाने सुपर फोरमध्ये एक विजय व एका अनिर्णीत निकालासह चार गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यानंतर मलेशिया (३ गुण), कोरिया (२ गुण) आणि पाकिस्तान (१ गुण) यांचा क्रमांक आहे. भारतीय संघला शनिवारी खेळल्या जाणाºया लढतीत बरोबरीवर समाधान मानावे लागले तरी रविवारी खेळल्या जाणा-या अंतिम लढतीसाठी भारतीय संघाचे स्थान पक्के होईल. कारण भारतीय संघाचे गोलअंतर अन्य संघाच्या तुलनेत सरस आहे. पण, पाक संघाकडे गमावण्यासारखे काही नसल्यामुळे आम्हाला कमकुवत लेखू नका असा जगाला इशारा देण्यासाठी ते सज्ज झाले असतील. पाकिस्तानसाठी मात्र स्पर्धेची पुढील वाटचाल सोपी नाही. कारण अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवण्यासाठी त्यांना भारताविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल आणि त्याचसोबत सुपर फोर फेरीतील अन्य सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.भारताचा अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग सोपा झाला आहे, पण पाकिस्तानचा कमी लेखण्याची चूक करता येणार नाही. सध्याच्या फॉर्मव्यतिरिक्त कुठल्याही भारत-पाक हॉकी सामन्याचा निकाल खेळाडू मैदानावरील दडपण कसे झुगारतात यावर अवलंबून असतो. भारतीय संघाला मात्र या लढतीत सकारात्मक निकालाची आशा आहे. या व्यतिरिक्त अन्य कुठलाही निकाल त्यांना पचनी पडणार नाही.भारतासाठी या स्पर्धेत सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आघाडीची फळी आहे. त्यात आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, एस.व्ही. सुनील, ललित उपाध्याय आणि युवा गुरजंत सिंग यांनी शानदार मैदानी गोल नोंदविले आहेत. सुपर फोरच्या अन्य लढतीत कोरियापुढे मलेशियाचे आव्हान राहील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतPakistanपाकिस्तान