शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Hockey World Cup 2018 : नेदरलँड्ससमोर मलेशियाची शरणागती, 7-0 असा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2018 6:37 PM

Hockey World Cup 2018: गत उपविजेत्या नेदरलँड्सने पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मलेशियाचा 7-0 असा धुव्वा उडवला.

ठळक मुद्देनेदरलँड्सचा मलेशियावर 7-0 असा विजयजेरोन हेर्त्झबर्गर विजयात सिंहाचा वाटामलेशियाच्या कमकुवत बचावाचा पुरेपूर फायदा

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : गत उपविजेत्या नेदरलँड्सने पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मलेशियाचा 7-0 असा धुव्वा उडवला.  जेरोन हेर्त्झबर्गर तीन गोल करताना विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला मिर्को प्रुयसर, मिंक व्हेन डेर विर्डन, रॉबर्ट केपरमन आमि थिएरी ब्रिंकमन यांनी प्रत्येकी एक गोल करून चांगली साथ दिली. 

'D' गटातील नेदरलँड्स आणि मलेशिया यांच्यातील सामन्यात गतउपविजेत्या नेदरलँड्सचे पारडे जड होतेच. विश्वचषक स्पर्धेत उभय संघ चारवेळा समोरासमोर आले आणि त्यात तीनवेळा नेदरलँड्सने बाजी मारली. आजची लढत होती ती नेदरलँड्सचा जेरोन हेर्त्झबर्गर आणि मलेशियाचा फैझल सारी यांच्यात. हेर्त्झबर्गरने 213 सामन्यांत 54 गोल्स केले आहेत, त्याउलट सारीने 223 सामन्यांत 104 गोल्स केलेत. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण वरचढ ठरणार याची उत्सुकता होती. सामन्याच्या 12व्या मिनिटाला हेर्त्झबर्गरने अप्रतिम मैदानी गोल करताना नेदरलँड्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर मलेशियाचा खेळ काही काळापुरता ढिसाळ झालेला दिसला. त्यांनी नेदरलँड्सच्या खेळाडूंना गोल करण्यासाठी बरीच वाट मोकळी करून दिली. दुसऱ्या सत्रात 21व्या मिनिटाला मिर्को प्रुयसरने नेदरलँड्सच्या खात्यात आणखी एक गोलची भर घातली. मलेशियाच्या बचावफळीतीत चुकांचा पुरेपूर फायदा उचलतान नेदरलँड्सच्या आक्रमणफळीने सुरेख मैदानी गोल केला. या सामन्यात ऑरेज आर्मीच्या रॉबर्ट केम्पेरमनने विक्रमाला गवसणी घातली. ऑरेंज आर्मीकडून त्याने 200 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा मान पटकावला. 29व्या मिनिटाला हेर्त्झबर्गरने आणखी एक गोल करताना न्यूझीलंडला पहिल्या सत्रात 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.  दुसऱ्या सत्रात नेदरलँड्सच्या आक्रमणाची धार अधिक तीव्र झाली. 35व्या मिनिटाला मिंक व्हॅन डेर विर्डनने गोल करत त्यांची आघाडी 4-0 अशी वाढवली. त्यात 42 व्या मिनिटाला रॉबर्ट केम्पेरमनने भर घातली. नेदरलँड्सने तिसऱ्या सत्रापर्यंत 5-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती.चोथ्या सत्राच्या 57 व्या मिनिटाला थिएरी ब्रिंकमन आणि 60व्या मिनिटाला हेर्त्झबर्गरने यांनी गोल करताना नेदरलँड्सचा 7-0 असा विजय निश्चित केला. 

 

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धा