शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Hockey World Cup 2018 : वर्ल्ड कप जेतेपदाचा 43 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 11:20 IST

Hockey World Cup 2018 : भारतीय पुरुष हॉकी संघाने आजपासून सुरू होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.

ठळक मुद्देभारतीय पुरुष हॉकी संघाने आजपासून सुरू होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज1975 नंतर पहिल्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी भारत प्रयत्नशीलभारताचा पहिला मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : भारतीय पुरुष हॉकी संघाने आजपासून सुरू होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. युवा खेळाडूंनी भरलेल्या या संघाला भारतात होणाऱ्या पुरुष विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी आहे. भारताने 1975 मध्ये अखेरचा विश्वचषक उंचावला होता. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अव्वल चार संघांमध्येही स्थान पटकावण्यात भारताला अपयश आले. 1982 आणि 2010 मध्ये भारताला या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला होता, परंतु त्याहीवेळेला आपण अपयशी ठरलो. भारताच्या खात्यात 8 ऑलिम्पिक सुवर्णपदकांचा समावेश आहे, परंतु त्यांनी एकदाच विश्वचषक जिंकता आलेला आहे. 1975 च्या स्पर्धेत त्यांनी पाकिस्तानला 2-1 असे नमवून जेतेपद पटकावले होते.भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर रंगणाऱ्या या स्पर्धेत भारताला 'C' गटात स्थान देण्यात आले आहे. त्यांच्यासमोर बेल्जियम, कॅनडा व दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे.  या गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल, तर दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील संघांना क्रॉसओव्हर राऊंडमध्ये खेळाले लागेल.  भारतीय संघाचे वेळापत्रक28 नोव्हेंबरः भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( सायंकाळी 7 वाजता)2 डिसेंबरः भारत विरुद्ध बेल्जियम ( सायंकाळी 7 वाजता)8 डिसेंबरः भारत विरुद्ध कॅनडा ( सायंकाळी 7 वाजता) भारतीय संघपी. आर. श्रीजेश, कृष्णा पाठक, हरमनप्रीत सिंग, बिरेंद्र लाक्रा, वरुण कुमार, कोठाजीत सिंग, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंग्लेनसाना सिंग, निलकांत शर्मा, हार्दिक सिंग, सुमित, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, ललित उपाध्ये आणि सिमरनजीत सिंग.  

थेट प्रक्षेपणस्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार अॅप, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्ही 

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाHockeyहॉकीIndiaभारत