शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Hockey World Cup 2018: भारत-नेदरलँड्स यांच्यात उपांत्यपूर्व सामना आज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:04 IST

विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व लढतीत नेदरलँड्स संघाविरुद्ध यशस्वी होण्याचे कडवे आव्हान भारतापुढे आहे.

भुवनेश्वर : विश्वचषक स्पर्धेत ४३ वर्षांनंतर सुवर्ण विजयाचे स्वप्न उराशी बाळगून घरच्या मैदानावर यशस्वी घोडदौड करीत असलेल्या भारतीय हॉकी संघापुढे खरे आव्हान गुरुवारी असेल. विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व लढतीत नेदरलँड्स संघाविरुद्ध यशस्वी होण्याचे कडवे आव्हान भारतापुढे आहे. प्रतिस्पर्धी संघाने गेल्या दोन सामन्यात तब्बल दहा गोल नोंदवून आक्रमक मनसुबे जाहीर केले.विश्व क्रमवारीत नेदरलँड चौथ्या तर भारत पाचव्या स्थानावर आहे. भारताने या स्पर्धेच्या क गटात तीन सामन्यात दोन विजय आणि एक ड्रॉ यासह अव्वल स्थान मिळवले. नेदरलँडने ड गटात दुसरे स्थान गाठले. मंगळवारी क्रॉस ओव्हरमध्ये या संघाने कॅनडाचा पाच गोलने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली होती.खच्चून गर्दीचा अनुभव असलेल्या कलिंगा स्टेडियमवर चाहत्यांना भारताचा पुन्हा एक विजय पाहायचा आहे. भारताने याआधीचा अखेरचा साखळी सामना ८ डिसेंबर रोजी खेळला होता. प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांच्यानुसार खरी स्पर्धा बाद फेरीपासूनच आहे. भारतीय संघ नेदरलँड्सचे आव्हान परतविण्यास सज्ज असल्याचे त्यांचे मत आहे. प्रशिक्षकाच्या आत्मविश्वासामुळे भारताने तिसऱ्या स्थानावरील बेल्जियमला रोखले, हे विशेष.सिमरनजित सिंग, ललित उपाध्याय, मनदीप सिंग आणि ओडिशाचा ड्रॅग फ्लिकर अमित रोहिदास यांच्यासह सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. बचावफळीनेदेखील निराश केले नाही. अखेरच्या मिनिटाला कच खाण्याची वृत्तीदेखील खेळाडूंनी संपविली आहे.दुसरीकडे नेदरलँडने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक १८ गोल नोंदविले. साखळीत मलेशियावर ७-० आणि पाकिस्तानवर ५-१ असा विजय नोंदविला. जर्मनीकडून मात्र त्यांचा १-४ असा पराभव झाला होता. प्रशिक्षक मॅक्स केलडास यांनी कबुली दिली की, ‘कलिंगावर भारताला नमविणे सोपे नाही. प्रतिस्पर्धी प्रेक्षकांचा दबाव असेल. पण माझे खेळाडू अनुभवी असून सामना जिंकण्यास सज्ज आहेत.’ लंडन ऑलिम्पिक २०१२ आणि विश्वकप २०१४ मध्ये नेदरलँडच्या महिला हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून देणारे प्रशिक्षक पुढे म्हणाले,‘आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करू आणि जिंकू.’ पहिल्यांदा नेदरलँड्सला नमविण्याचे लक्ष्यभारतीय संघाने गेल्या काही वर्षांत नेदरलँड्सविरुद्धचा रेकॉर्ड सुधारला आहे. मागील नऊ सामन्यात उभय संघ प्रत्येकी चार सामने जिंकले. एक सामना ड्रॉ झाला. विश्वचषकात दोन्ही संघ सहावेळा परस्परांविरुद्ध खेळले. सर्व सहा सामने नेदरलँडने जिंकले. १९७१ पासून सुरू झालेली ही स्पर्धा भारत १९७५ ला एकदाच जिंकला. १९९४ ला सर्वोत्कृष्ट कामगिरीसह भारत पाचव्या स्थानावर होता. दुसरीकडे स्पर्धेत सर्वात यशस्वी संघांपैकी एक मागचा उपविजेता नेदरलँड तीनवेळा (१९७३, १९९० आणि १९९८) विश्वविजेता राहिला आहे. गुरुवारी दुसरा उपांत्यपूर्व सामना जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात खेळला जाणार आहे.आक्रमक हॉकीत कुठलाही बदल होणार नाही. मोठ्या संघांविरुद्ध चांगला खेळ करण्याचा आम्हाला अनुभव आहे. नेदरलँड्सलाही हरवू शकतो. सध्याचा संघ मोठ्या संघाला घाबरणारा नसल्याने यंदा विश्वचषकातून रिकाम्या हाताने परतणार नाही, याचा मला विश्वास आहे.’- हरेंद्रसिंग, मुख्य प्रशिक्षक, भारत

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाIndiaभारत