हॉकी इंडियाने प्रशिक्षकपदी भारतीय कोचची नियुक्ती करावी, माजी दिग्गज खेळाडूंचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:06 IST2017-09-04T01:05:32+5:302017-09-04T01:06:02+5:30
आंतरराष्ट्रीय पातळीवर हॉकी संघाच्या सातत्याने साधारण कामगिरीमुळे रोलेंट ओल्टमन्स यांना हटविण्यात आल्यानंतर माजी खेळाडूंनी चमकदार कामगिरी व गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रशासकांनी भारतीय प्रशिक्षकाची नियुक्ती करावी, असे मत व्यक्त केले आहे.

हॉकी इंडियाने प्रशिक्षकपदी भारतीय कोचची नियुक्ती करावी, माजी दिग्गज खेळाडूंचे मत
जालंधर : आंतरराष्ट्रीय पातळीवर हॉकी संघाच्या सातत्याने साधारण कामगिरीमुळे रोलेंट ओल्टमन्स यांना हटविण्यात आल्यानंतर माजी खेळाडूंनी चमकदार कामगिरी व गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रशासकांनी भारतीय प्रशिक्षकाची नियुक्ती करावी, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे खेळाडू व प्रशिक्षक यांच्यादरम्यान संवाद नसल्याची स्थिती निर्माण होणार नसल्याचे या माजी दिग्गजांचे मत आहे.
हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक राजिंदरसिंग यांनी विदेशीऐवजी देशी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याचे समर्थन केले. राजिंदर म्हणाले,
‘विदेशी प्रशिक्षक भारतीय खेळाडूंसाठी उपयुक्त नाही. भारताला हॉकीमध्ये गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हॉकी इंडियाने देशी प्रशिक्षकाची नियुक्ती करायला हवी.
हॉकी इंडियाला आठ वेळा आॅलिम्पिक सुवर्णपदक पटकावणाºया भारतात प्रशिक्षकपदासाठी योग्य उमेदवार निदर्शनास येत नाही का, असा सवालही त्यांनी या वेळी केला.’
खेळाडू व प्रशिक्षक यांच्यादरम्यान संवाद असणे आवश्यक आहे आणि त्यात भारतीय प्रशिक्षक असतील तर खेळाडूंसोबत संवाद साधताना अडचण जाणार नाही, असे सोढी यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)