शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

चौरंगी हॉकी मालिका : भारताने केली पराभवाची परतफेड ,बेल्जियमवर ५-४ ने रोमहर्षक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 1:03 AM

भारतीय हॉकी संघाने गुरुवारी शानदार कामगिरीच्या बळावर चौरंगी हॉकी मालिकेतील सामन्यात बेल्जियमवर ५-४ असा रोमहर्षक विजय नोंदवत या आधी झालेल्या पराभवाचीदेखील परतफेड केली.

हॅमिल्टन: भारतीय हॉकी संघाने गुरुवारी शानदार कामगिरीच्या बळावर चौरंगी हॉकी मालिकेतील सामन्यात बेल्जियमवर ५-४ असा रोमहर्षक विजय नोंदवत या आधी झालेल्या पराभवाचीदेखील परतफेड केली.भारताला याआधी जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या बेल्जियमकडून १-२ असा पराभवाचा धक्का बसला होता. भारतासाठी रूपिंदरपालसिंग (चौथ्या आणि ४२ व्या) दोन तसेच हरमनप्रीत (४६), ललित उपाध्याय (५३) तसेच दिलप्रीतसिंग (५९ वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. बेल्जियमकडून जॉन डोमेन (१७ व्या), अलेक्झांडर हेंड्रिक्स (४५ व्या) आणि टॉम बून (५६) यांना गोल नोंदविण्यात यश आले.भारताचा पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवर रूपिंदरने केला. दुसºया क्वार्टरमध्ये युरोपियन संघाने सर्व शक्ती पणाला लावली. जॉनने गोल करीत बरोबरी साधून दिली. तिसºया क्वार्टरमध्ये उभय संघ आक्रमक खेळले. बेल्जियमने ३७ व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. (वृत्तसंस्था)काही मिनिटानंतर रूपिंदरने गोल नोंदवून २-२ अशी आघाडी घेतली. हेंड्रिक्सने पुन्हा रिबाऊनडवर गोल नोंदवित ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.अखेरच्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीतने रिबाऊंडवर गोल नोंदवून ३-३ बरोबरी साधण्यात यश मिळविले.भारताला पुढच्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला; पण तो व्यर्थ गेला. दरम्यान विवेकप्रसाद याने बेल्जियमची ‘डी’ भेदून चेंडू ललितकडे सोपविला. त्यावर ललितने अलगद गोल नोंदविला. सामना संपायला काही सेकंद उरले असताना रमणदीपच्या पासवर दिलप्रीतने विजयी गोल केला. भारतीय संघ २७ जानेवारी रोजी जपानविरुद्ध खेळणार आहे.

टॅग्स :Hockeyहॉकी