लंडन - आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य खुणावत असलेल्या भारतीय संघाची महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच कसोटी लागणार आहे. 2017च्या आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला सलामीच्याच सामन्यात यजमान इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे. जागतिक क्रमावारीत इंग्लंड दुस-या, तर भारत दहाव्या स्थानावर आहे. शनिवारपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत भारताचे नेतृत्व संघातील अनुभवी खेळाडू राणी रामपाल करणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्पेन दौ-यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांच्याकडून विश्वचषक स्पर्धेत अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. भारताला ब गटात इंग्लंडव्यतिरिक्त अमेरिका आणि आयर्लंड यांचा सामना करावा लागणार आहे.
FIH Women's Hockey World Cup : भारतीय संघाची कसोटी, सलामीलाच इंग्लंडचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 16:59 IST
आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य खुणावत असलेल्या भारतीय संघाची महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच कसोटी लागणार आहे.
FIH Women's Hockey World Cup : भारतीय संघाची कसोटी, सलामीलाच इंग्लंडचे आव्हान
ठळक मुद्दे भारतीय संघातील 18 पैकी 16 खेळाडू प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत.