नवी दिल्ली : कामामिगाहारा (जपान) येथे शनिवारपासून (दि. २८) सुरू होणाºया महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे सोपविण्यात आले आहे. गोलरक्षक सविताला उपकर्णधारपदी नेमण्यात आले आहे.नेदरलॅँड आणि बेल्जियम दौºयावर गेलेल्या महिला संघामध्ये आशियाई स्पर्धेसाठी पाच बदल करण्यात आले आहेत. अनुभवी डिफेंडर सुशीला चानूचे संघात पुनरागमन झाले असून फॉरवर्ड नवनीत कौर, नयज्योत कौर आणि सोनिका यांचासुद्धा संघात समावेश करण्यात आला आहे.गोलरक्षकाची जबाबदारी सविता व रजनी इ. तर डिफेन्सची दीप ग्रेस इक्का, सुनीता लाक्रा, सुमनदेवी व गुरजीत कौर सांभाळतील. मिडफिल्डमध्ये नमिता टोप्पो, निक्की प्रधान, मोनिका, लिलिमा मिज आणि नेहा गोयल, तर राणी रामपाल, वंदना कटारिया आणि लालरेम्सियामी यांच्याकडे फॉरवर्डची जबाबदारी असेल.पुढील वर्षी लंडन येथे होणाºया विश्वचषक स्पर्धेसाठी या संघाने चांगली कामगिरी करून पात्र व्हावे, हे आव्हान संघाचे नवीन मार्गदर्शक हरेंद्र सिंग यांच्यासमोर असेल.(वृत्तसंस्था)संघ पुढीलप्रमाणेगोलरक्षक : सविता (उपकर्णधार), रजनी इ.; डिफेंडर : दीप ग्रेस इक्का, सुनीता लाक्रा, सुशीला चानू, सुमनदेवी, गुरजीत कौर; मिडफिल्डर : निक्की प्रधान, नमिता टोप्पो, मोनिका लिलिमा मिज, नेहा गोयल; फॉरवर्ड : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, लालरेम्सियामी, सोनिका, नवनीत कौर, नवज्योत कौर.संघामध्ये युवा व अनुभवी खेळाडू असून त्यांचा एकमेकांमध्ये चांगला समन्वय असल्याचा फायदा मिळणार आहे. या संघाची तयारी चांगली झाली असून वरील मानांकन असलेल्या संघांविरुद्धचे परदेशात खेळून त्यांच्या खेळात सुधारणा झाली आहे. समोरील संघाचे आव्हान पेलण्याची क्षमता या संघात आहे.- हरेंद्र सिंग, मार्गदर्शक
आशियाई महिला हॉकी स्पर्धा : भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:52 IST