शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

Asian Game 2018 : पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट रूपिंदरपालचे कमबॅक; भारताचा हॉकी संघ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 21:20 IST

ड्रॅगफ्लिकर रूपिंदर पाल सिंग आणि स्ट्रायकर आकाशदीप सिंग यांनी भारतीय पुरूष हॉकी संघात पुनरागमन केले आहे. पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेसाठी 18 सदस्यीय खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. या स्पर्धेत जेतेपद पटकावून 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याची भारताला संधी आहे. 

नवी दिल्ला - ड्रॅगफ्लिकर रूपिंदर पाल सिंग आणि स्ट्रायकर आकाशदीप सिंग यांनी भारतीय पुरूष हॉकी संघात पुनरागमन केले आहे. पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेसाठी 18 सदस्यीय खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. या स्पर्धेत जेतेपद पटकावून 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याची भारताला संधी आहे. जकार्ता येथे 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत आशियाई स्पर्धा होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारताने रौप्यपदकाची कमाई केली होती. त्या संघात केवळ दोनच बदल करण्यात आले आहेत. चॅम्पियन्स चषक स्पर्धेत रूपिंदरला विश्रांती देण्यात आली होती. त्याला जरमनप्रीत सिंगच्या जागी, तर आकाशदीपला दुखापतग्रस्त रमणदीप सिंगच्या जागी संधी मिळाली आहे. या संघाचे नेतृत्व गोलरक्षक पी. आर. श्रीजेश करणार आहे.  भारताने 2014च्या आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला नमवून सुवर्णपदक जिंकले होते आणि त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करून 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची थेट प्रवेशिका मिळवण्याचा भारतीय खेळाडूंचा निर्धार आहे. भारताचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी संघ निवडीवर आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आमचा संघ समतोल आहे. रमणदीप सिंगला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि तो आशियाई स्पर्धेत नसल्याचे दु:ख वाटत आहे. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८HockeyहॉकीIndiaभारतSportsक्रीडा