गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:06 IST2019-01-05T00:05:48+5:302019-01-05T00:06:07+5:30
तालुक्यातील बळसोंड भागातील आनंदनगर येथे एका युवकाने दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बासंबा : तालुक्यातील बळसोंड भागातील आनंदनगर येथे एका युवकाने दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मयत युवकाचे नाव निलेश शिवराज विके (२५) असून तो किरायाच्या घरात राहात असे. तो मुळचा असोली ता. जि. गोंदिया येथील असल्याची माहिती आहे. युवकाने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच फौजदार किशोर पोटे यांनी भेट देऊन पाहणी केली.