लग्न होत नसल्याने युवकाने घेतला गळफास, सेनगाव तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 20:44 IST2022-09-01T20:44:30+5:302022-09-01T20:44:47+5:30
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.

लग्न होत नसल्याने युवकाने घेतला गळफास, सेनगाव तालुक्यातील घटना
हिंगोली : लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून वाशिम जिल्ह्यातील एका युवकाने सेनगाव तालुक्यातील वाढोणा शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी सेनगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
कंकरवाडी (ता.रिसोड, जि.वाशिम) येथील ३५ वर्षीय शेतकरी मोहन सोपान जाधव हा २७ ऑगस्टपासून गायब होता. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास सेनगाव तालुक्यातील वाढोणा शिवारात लिंबाजी भगवान पडघान यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला गळफास घेतलेल्या अवस्थेत मोहनचे प्रेत आढळून आले.
लग्न होत नसल्याने मोहनने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत सेनगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक फौजदार शेख खुद्दुस यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.