शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

अनेकांचे संसार उघड्यावर; रमाई घरकुलला दोन वर्षांपासून निधीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 17:24 IST

जुने बांधकाम पाडल्याने संसार उघड्यावर आलेल्या अनेक लाभार्थ्यांनी पदरमोड करून घरकुल बांधले

ठळक मुद्देपदरमोड करून पूर्ण केले घरकुल३२ कोटींची आवश्यकता

हिंगोली : रमाई घरकुल योजनेसाठी मागील दोन वर्षांपासून निधी नसल्याने घरकुलांची जवळपास २७४० कामे रखडलेली आहेत. या योजनेतील लाभार्थी मेटाकुटीला आले असून निधीसाठी मात्र काहीच हालचाली दिसत नाहीत.

हिंगोली जिल्ह्यात रमाई घरकुल योजनेत २०१६-१७ ते १९-२० या कालावधीत जिल्ह्याला ६७६६ घरकुलांचे उद्दिष्ट होते. यापैकी ५९४६ जणांनी बांधकामासाठी नोंदणी केली होती. यापैकी ५५५३ जणांच्या जागेवर जाऊन जीओ टॅगिंग करण्यात आली. संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खाते क्रमांकासह पडताळणी करून ५४५० जणांची कामे मंजूर करण्यात आली होती. यापैकी ५ हजार जणांना पहिला हप्ता अदा करण्यात आला आहे. त्यामुळे एवढी कामे शेवटपर्यंत जाणे अपेक्षित होते. मात्र २०१८-१९ व २० या दोन वर्षांत निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने या लाभार्थ्यांची कामे रखडून पडली. त्याचा परिणाम म्हणून चौथ्या हप्त्यापर्यंत पोहोचलेल्या लाभार्थ्यांची संख्या केवळ १८२७ आहे. यात औंढा १९८, वसमत ३८९, हिंगोली ३५७, कळमनुरी ५१८, सेनगाव ३६५ अशी चौथा हप्ता अदा झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आहे. 

पदरमोड करून पूर्ण केले घरकुलशासनाकडून निधी मिळाला नसला तरीही जुने बांधकाम पाडल्याने संसार उघड्यावर आलेल्या अनेक लाभार्थ्यांनी पदरमोड करून घरकुल बांधले त्यामुळे जिल्ह्यात घरकुल पूर्ण झाल्याची संख्या ४०२६ आहे. तर अपूर्ण असलेले २७४० आहेत. आता या घरकुलधारकांना निधीची प्रतीक्षा आहे. अवघ्या १.२० लाखात घर बांधकाम सोपे नाही. त्यात पात्र असल्यास स्वच्छ भारत मिशनकडून१२ हजार तर मग्रारोहयोतून १८ हजार मिळतात. त्यामुळे दीड लाखांपर्यंतची रक्कम मिळते. याचा सर्व लाभार्थ्यांना लाभ होत नाही. काहींनी घर बांधकाम करताना पदरचे पैसे तर टाकले मात्र खाजगी कर्जही काढले आहे. त्यांना आता शासनाकडून मिळणारी रक्कमही मिळत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे.

३२ कोटींची आवश्यकताहिंगोली जिल्ह्यात जवळपास ४०२७ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. तर १८२७ लाभार्थ्यांनाच पहिला हप्ता मिळाला आहे. तर २७४० जणांचे बांधकामच रखडलेले आहे. ज्यांचे बांधकाम राहिले अथवा पुढील हप्ते मिळाले नाही, अशांसाठी ३२ कोटी लागणार आहे. तर शासनने आता दोन वर्षांपूर्वीच्या बांधकामांचा निधी देण्यास सांगितले आहे. त्यामुळे एवढा निधी नजीकच्या काळात या विभागाकडून मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. हा निधी कधी मिळेल, याची प्रतीक्षा लागली आहे.

तालुकानिहाय चित्रतालुका    चाौथा हप्ता    पूर्ण    अपूर्णऔंढा नाग.    १९८    ४८५    ३७१वसमत    ३८९    ८५१    ४४१हिंगोली    ३५७    ८३९    ६७२कळमनुरी    ५१८    १०५६    ६४५सेनगाव    ३६५    ७९५    ६११एकूण    १८२७    ४०२६    २७४०

टॅग्स :HomeघरfundsनिधीHingoliहिंगोली