आरक्षणासाठी कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:47 IST2018-11-25T00:47:07+5:302018-11-25T00:47:44+5:30
राज्य मराठा क्रांती समन्वय समितीच्या निर्णयानुसार २६ नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी विधानसभेला घेराओ घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी व हिंगोली तालुक्यातून हजारो मराठा समाजबांधव २५ नोव्हेंबर रोजी मुंबईक येथे रवाना होणार आहेत.

आरक्षणासाठी कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्य मराठा क्रांती समन्वय समितीच्या निर्णयानुसार २६ नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी विधानसभेला घेराओ घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी व हिंगोली तालुक्यातून हजारो मराठा समाजबांधव २५ नोव्हेंबर रोजी मुंबईक येथे रवाना होणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. या जनसंवाद यात्रेचा समारोप २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानसभेला घेराओ घालून करण्यात येणार आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्या अनुषंगाने तालुक्याच्या ठिकाणी बैठकीचे नियोजन करण्यात आले. जिल्हाभरातील तयारी पूर्ण झाली असून रविवारी मराठा समाजबांधव रेल्वे व इतर वाहनांनी हजारो मुंबई गाठणार आहेत.
बस सुरू करण्याची मागणी
हिंगोली - तालुक्यातील भांडेगाव मार्गे बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांसह विद्यार्थ्यांमधून होत आहे. भांडेगाव येथे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकसान होत आहे.