‘गोड बोला’ या शब्दांचा अर्थ तडजोड करणे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:57 IST2019-01-17T23:56:06+5:302019-01-17T23:57:07+5:30
दरवर्षी मकरसंक्रांती हा सण एक संदेश घेऊन येतो, तो संदेश म्हणजे गोड बोला! या शब्दांचा अर्थ तडजोड करुन गोड बोलणे हा नाही. तर मनाभावातून आपली प्रकृती, आपल्या विचारांना व्यक्त करण्यासाठी आपण तणावमुक्त होऊन गोड बोलले पाहिजे, असे साहित्यिक विलास वैद्य म्हणाले.

‘गोड बोला’ या शब्दांचा अर्थ तडजोड करणे नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दरवर्षी मकरसंक्रांती हा सण एक संदेश घेऊन येतो, तो संदेश म्हणजे गोड बोला! या शब्दांचा अर्थ तडजोड करुन गोड बोलणे हा नाही. तर मनाभावातून आपली प्रकृती, आपल्या विचारांना व्यक्त करण्यासाठी आपण तणावमुक्त होऊन गोड बोलले पाहिजे, असे साहित्यिक विलास वैद्य म्हणाले.
भारतीय संस्कृतीत अनेक संदेश दडलेले आहेत. ते आत्मसात करुन जीवन व्यतीत केले तर उत्तम कार्य करण्यासाठी एक उर्जा मिळते. ही उर्जा केवळ माणसांच्या गोड बोलण्यातून मिळते. आपण किती बोलतो आणि कीती रागात येतो. याचे प्रत्येकाने आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. द्वेश, मत्सर, राग हे माणसाचे शत्रू आहेत. या शत्रूपांसून मुक्त होण्याचे काम संक्रांतीसारख्या सणाच्या माध्यमातून होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलवरुन संवाद वाढला आहे. संवादाविना माणूस माणसांपासून तुटत चालला आहे. आणि हाच तुटलेला संवाद जोडण्याचे काम संक्रांतीसारखा सण करतो. माणसांमध्ये वाद होतच असतात पण मतभेद होता कामा नये. वाद व्हावेत पण इतकेही नको की, माणूस पुन्हा एकमेंकाशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित करु शकणार नाही. गोड बोलल्याने विचारांना प्रेरणा मिळते. यातून शांत जीवन व्यतित करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे शांत जीवन जगण्यासाठी ‘गोड बोला, गुड बोला’ हा उपक्रम मोठी भूमिका निभावत आहे.
एका कविने म्हटले आहे. ‘हेलकावूनही शांत होई पाणी, ती माझी कहाणी’, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात हेलकावे येत असतात पण या हेलकाव्यातून आपण स्थिर, स्थावर आणि शांत होण्याची कला आत्मसात करण्याची गरज आहे. मकरसंक्रांती हा सण परंपरेचा संदेश देतो.