गळा आवळल्याने महिलेचा मृत्यू;साळवा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:10 IST2018-07-29T23:10:29+5:302018-07-29T23:10:42+5:30
कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे एका विवाहितेचा दोरीने गळा आवळल्याने मृत्य झाला. सदर घटने प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात २८ जुले रोजी रात्री ९.२० वाजता अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या गळ्यावर दोरीने आवळल्याचे व्रण दिसून येत आहेत.

गळा आवळल्याने महिलेचा मृत्यू;साळवा येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे एका विवाहितेचा दोरीने गळा आवळल्याने मृत्य झाला. सदर घटने प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात २८ जुले रोजी रात्री ९.२० वाजता अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या गळ्यावर दोरीने आवळल्याचे व्रण दिसून येत आहेत.
वैशाली संतोष करंडे (२५) असे मयत महिलेचे नाव आहे. वैशाली यांचा सुती दोरीने गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी गोपीनाथ परशुराम दळवी यांच्या माहितीवरून मृत्यूची नोंद अखाडा बाळापूर ठाण्यात करण्यात आली आहे. तपास बाळापूर ठाण्याचे सपोउनि एन. एस. दीपक हे करीत आहेत.