शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

हिंगोली जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांचा तिढा यंदा सुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 7:49 PM

८0 गावांची या योजनांवर भिस्त

ठळक मुद्देदोन योजनांची कामे सुरू एक पूर्ण, एक निविदेत

हिंगोली : जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांपैकी गाडीबोरी योजनेचे काम पूर्ण झाले असून सिद्धेश्वर व पुरजळचे काम सुरू आहे. तर मोरवाडी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी गेला आहे.

हिंगोली जिल्ह्यात यंदा चांगल्या पर्जन्यामुळे अजूनतरी कुठे टंचाईच्या झळा जाणवत नाहीत. मात्र आता हळूहळू उन्हाचा कडाका वाढत चालला असल्याने टंचाईकडे वाटचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांवर जवळपास ८0 पेक्षा जास्त गावांचा भार असल्याने या योजना सुरू असल्या तरीही एवढ्या गावांचा प्रश्न एका झटक्यात मिटू शकतो. यामध्ये पुरजळ प्रादेशिक योजनेचे काम सुरू आहे. या योजनेखाली औंढा व वसमत तालुक्यातील तब्बल २0 गावे येतात. ही योजना आता जलवाहिनीच्या दुरुस्तीसह सौरपंपावर चालणार आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी ५.३८ कोटी रुपये मंजूर झाले होते. जलशुद्धीकरण केंद्र व उद्भवाचे काम पूर्ण झाले आहे. पंपिंग मशिनरीचे काम सुरू आहे. नवीन वाहिनीही काही ठिकाणी होत असून पाईप पुरवठा झाला आहे.

सिद्धेश्वर प्रादेशिक योजनेसाठीही ५.३४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली होती. हे काम जीवन प्राधिकरणकडून करण्यात येणार आहे. या योजनेत दुरुस्तीसह, सौरपंप व इतर बाबींचा समावेश आहे. मात्र यातील २६ पैकी १३ गावेच पुनरुज्जीवन योजनेत सहभागी होणार आहेत. ही योजना दुरुस्ती निविदा स्तरात असल्याचे अहवालात म्हटले आहे.

कळमनुरी तालुक्यातील २५ गावे मोरवाडी प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसाठी १0.११ कोटींचे अंदाजपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. अद्याप त्याला मंजुरीच मिळाली नाही. तर ८ गावे गाडीबोरी तिखाडी योजनेत आता ६ गावेच सहभागी राहणार आहेत. उर्वरित दोन गावे यातून वगळली आहेत. या योजनेच्या दुरुस्तीसाठी ४६ लाखांची मंजुरी मिळाली होती. यात जल वाहिनी दुरुस्ती, जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग मशिनरी दुरुस्ती, उंच खांबावरील दोन जलकुंभ आदी कामे करून दुरुस्ती पूर्ण करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

मुख्यमंत्री पेयजलमध्येही कामेजिल्ह्यात मुख्यमंत्री पेयजल योजनेतीलही काही कामे सुरू आहेत. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, वारंगा फाटा, वसमत तालुक्यातील सोमठाणा, औंढा तालुक्यातील येहळेगाव येथील कामांचा समावेश आहे. यात नांदापूर व वारंगा येथील कामे प्रगतीपथावर आहेत. सोमठाणा येथील काही दिवसांपूर्वीच सुरू झाले. येहळेगाव सोळंके येथील कामही अंतिम टप्प्याकडे आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीgovernment schemeसरकारी योजना