विवाहितेस अॅसिड पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:05 IST2018-10-29T00:04:48+5:302018-10-29T00:05:03+5:30
येथील एका विवाहितेस मानसिक व शारिरीक त्रास देवून गुत्तेदारीकरीता ५० हजार रुपये घेवून ये, असे म्हणत सासरच्या मंडळीने शौचालय साफ करण्याचे विषारी अॅसिड पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.

विवाहितेस अॅसिड पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : येथील एका विवाहितेस मानसिक व शारिरीक त्रास देवून गुत्तेदारीकरीता ५० हजार रुपये घेवून ये, असे म्हणत सासरच्या मंडळीने शौचालय साफ करण्याचे विषारी अॅसिड पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. पिडीत महिलेवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. कुरूंदा येथील अनजूनाबी महेबुब शाहा (२२) हिचा विवाह ४ डिसेंबर २०१६ रोजी झाला होता. तेव्हापासून सारसरच्या मंडळीकडून गुत्तेदारी व सेंटरींग खरेदीकरीता माहेरहून ५० हजार रुपये घेऊन येण्याचा तगादा लावला होता. तसेच शिवीगाळ, मारहाण करीत शारिरीक मानसीक छळ केला. रविवारी तर विवाहितेस जबरीने शौचालय साफ करण्याचे अॅसीड फिनाईल पाजण्यात आले असून तो डब्बाही जप्त करण्यात आला. याप्रकरणी अनजुनाबी महेबुब शाहा यांच्या फिर्यादीवरून कुरूंदा पोलीसांत आरोपी नवरा महेबुब शाहा, सासरा जिलानी शाहा, सासू आरेफाबी बेगम, दीर बबलू शाहा चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.