हिंगोलीतील लिंबाळा परिसरात वॉचमनचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 16:01 IST2018-11-19T16:00:03+5:302018-11-19T16:01:08+5:30
नारायण गायकवाड हे त्या ठिकाणी वॉचमन म्हणून खाजगी नोकरी करीत होते.

हिंगोलीतील लिंबाळा परिसरात वॉचमनचा मृतदेह आढळला
हिंगोली : शहरागतलच्या लिंबाळा परिसरातील आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वॉचमनचा मृतदेह आढळल्याची आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मयत इसमाचे नाव नारायण धोंडबा गायकवाड (५५, रा. वडद ता. जि. हिंगोली ) असे आहे.
आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. नारायण गायकवाड हे त्या ठिकाणी वॉचमन म्हणून खाजगी नोकरी करीत होते. परंतु गायकवाड यांचा सोमवारी सकाळी दोरखंडाने गळफास घेतलेल अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोरखंडाने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असला तरी, त्यांचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे गायकवाड यांची आत्महत्या की घातपात आहे हे मात्र समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत. हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील प्रक्रिया सुरू होती.