शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

गर्मीमुळे रात्री ग्रामस्थ छतावर झोपले; चोरट्यांनी संधी साधत एकाच गावातील ५ घरे फोडली

By विजय पाटील | Published: May 20, 2023 12:04 PM

हिंगोली जिल्ह्यात एकाच गावात पाच ठिकाणी घरफोडी, ग्रामस्थांनी रात्र काढली जागून 

- इब्राहीम जहागीरदारकुरुंदा (हिंगोली): वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे शुक्रवारी (दि. १९ ) मध्यरात्री १ ते २ वाजे दरम्यान जवळपास ५ ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये जवळपास साडेतीन लाख रुपयांचे ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या चोरीच्या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास ही चोरीची घटना समजताच ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.

पांगरा (शिंदे) येथे मध्यरात्री १ ते २ वाजेदरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच ठिकाणी हातसफाई केल्याचे समोर आले. पांगरा शिंदे येथील अशोक शिंदे  यांच्या घरी कपाटामधील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रक्कम चोरट्यांनी चोरली. कुंडलिक शिंदे यांच्या घरातील हळदीचे ठेवलेली रक्कम लंपास केली. तसेच संजय शिंदे, श्याम शिंदे यांच्या घरी देखील चोरी झाली. तर  गोविंद शिंदे यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी या गावात धुमाकूळ घातला. 

चोरट्यांनी साधली संधी...उन्हाळ्यात वातावरण तापल्याने रात्री ग्रामस्थ छतावर झोपले होते.  हीच संधी साधून चोरट्यांनी  हात साफ केला. घटनास्थळी कुरुंदा पोलिसाच्या पथकांनी भेट दिली आहे. चोरीच्या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत अंदाजे साडेतीन लाख रुपयांचे एकूण ऐवज चोरी गेल्याचे समजते. चोरीचा प्रकार  समजताच मध्यरात्रीच् ३ वाजेपासून नागरिक जागरण करत बसले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली