शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शहर ठाण्यात वाहनांची जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:16 AM

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलीस दलाच्या नियोजनशून्यतेवर माध्यमांतून टिकेचा सूर उमटल्यानंतर त्याचे खापर शहर पोलीस ठाण्यावर फुटले. त्यांनीही ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अचानक कारवाईला सुरुवात करीत मिळेल ते वाहन पोलीस ठाण्यात आणून लावल्याने ही सूडभावना असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलीस दलाच्या नियोजनशून्यतेवर माध्यमांतून टिकेचा सूर उमटल्यानंतर त्याचे खापर शहर पोलीस ठाण्यावर फुटले. त्यांनीही ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अचानक कारवाईला सुरुवात करीत मिळेल ते वाहन पोलीस ठाण्यात आणून लावल्याने ही सूडभावना असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत होती.हिंगोली शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काही दिवसांपूर्वी खुद्द पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी बैठक घेतली होती. सामान्यांना त्रास न होता ही मोहीम राबविण्यास त्यांनी आवर्जून सांगितले होते. मात्र एकाच दिवसात ही मोहीम गुंडाळली अन् शिस्तीपेक्षा बेशिस्तच वाढली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या दिवशी बाहेरून आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी नागरिकांना सुकर होईल, अशा पद्धतीने वागण्याऐवजी जणू कर्फ्य लागल्यासारखी वागणूक दिली. तर काहींनी प्रचंड दुर्लक्ष केले. शिवाय सगळ्यात जास्त रोषाचा सामना करावा लागला तो पुढाºयांच्या पासेसवरून. पुतळा परिसरातील पासेसचे नियोजन व्यवस्थित झाले नाही, हे मान्य. मात्र सन्मानही तेवढाच महत्त्वाचा होता. यावरून गदारोळ होणे साहजिकच आहे. मात्र यावरून चिडून शहरात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केल्याने पुन्हाही नागरिकांना वेठीस धरण्याचेच काम केले जात आहे. चुकीच्या बाबींना पोलिसांनी थारा देवूच नये. मात्र इतरांनाही नाहक अडकवून धरल्याने पुन्हा बोंब उठत आहे. वाहतुकीपेक्षा अधीक्षकांनी आधी आपल्याच लोकांना शिस्त लावली तर अधिक सोयीस्कर होणार असल्याच्या प्रतिक्रिया सामान्यांतून उमटत होत्या.

टॅग्स :Policeपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस