हिंगोली शहरासह जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 18:03 IST2021-05-28T18:02:57+5:302021-05-28T18:03:25+5:30

या पावसात वादळी वाऱ्यामुळे कौठा येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. वीज ताराही तुटल्या. 

Unseasonal rains with gusts of wind in the district including Hingoli town | हिंगोली शहरासह जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस

हिंगोली शहरासह जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस

हिंगोली : शहरासह जिल्ह्यातील विविध भागात शुक्रवारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही भागात घरावरील पत्रे उडाले. तर वीज ताराही तुटल्या.

हिंगोलीसस परिसरात बासंबा, पिंपळखुंटा, डिग्रस कऱ्हाळे, खानापूर चित्ता या भागात पावसाने हजेरी लावली. वसमतसह तालुक्यातील कुरुंदा, कौठा, आडगाव रंजे या परिसरात अवकाळी पाऊस झाला. या पावसात वादळी वाऱ्यामुळे कौठा येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. वीज ताराही तुटल्या. 

हिंगोली शहरातही सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोंढ्यात हळद घेवून आलेल्या शेतकऱ्यांची धांदल उडाली. ज्या शेतकऱ्यांच्या मालाची मोजणी सुरू होती, अशांना टेम्पो झाकण्यासाठी कवायत करावी लागली. इतर शेतकऱ्यांचा माल टेम्पोतच झाकून असल्याने नुकसान टळले. काही भागात या पावसामुळे आंब्यांचे नुकसान झाले. तर भुईमुगाच्या काढणीतही यामुळे व्यत्यय आल्याचे दिसून येत होते. आज दुपारनंतर ढगाळ वातावरण कायम राहिले.

Web Title: Unseasonal rains with gusts of wind in the district including Hingoli town