शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सलग तिसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी रात्रीला पावसाने हजेरी लावली. काही भागात तुरळक सरी कोसळल्या तर काही भागात मध्यम पाऊस ...

हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी रात्रीला पावसाने हजेरी लावली. काही भागात तुरळक सरी कोसळल्या तर काही भागात मध्यम पाऊस झाला. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्ह्यातील औंढा, डिग्रस कऱ्हाळे, कौठा, कळमनुरी, पोतरा, वाकोडी, फाळेगाव, कनेरगाव, सवना या भागात पावसाने हजेरी लावली. तर वसमत, कौठा, गोरेगाव, आंबा, कडोळी, जवळा पांचाळ या भागात वादळी वारे वाहत होते.

या वादळी वाऱ्यामुळे यंदा आंब्याचा बहर झडत असून झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर यंदा आंबा मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांचा गहू काढणीत आहे. काहींनी हरभऱ्याच्या सुड्याही तशाच झाकून ठेवल्या. तर काही जण काढणीसाठी हात लावायच्या तयारीत असले की, पावसामुळे नुकसान होत आहे. रब्बी ज्वारीलाही याचा फटका बसत आहे. हळदीच्या काढणीतही या पावसामुळे व्यत्यय येत असल्याचे चित्र आहे. पपई, केळीचेही काही भागात नुकसान होत आहे. या प्रकारामुळे शेतकरी मेटाकुटीला आहे.