बालकावर अनैसर्गिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 23:37 IST2019-03-20T23:37:00+5:302019-03-20T23:37:04+5:30

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला असलेल्या मुलावर हॉटेलमालकाने अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पीडित बालकाच्या मातेच्या फिर्यादीवरुन हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 Unnatural oppression on the child | बालकावर अनैसर्गिक अत्याचार

बालकावर अनैसर्गिक अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला असलेल्या मुलावर हॉटेलमालकाने अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पीडित बालकाच्या मातेच्या फिर्यादीवरुन हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जवळा बाजार येथील बसस्थानक परिसरात औंढा वाले हे हॉटेल असून या हॉटेलमध्ये १२ वर्षीय मुलगा काम करत असताना हॉटेलचा मालक औंढेवाला मौलाना याने अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याची व्हिडिओ क्लीप तयार करून व्हायरल केली.
तसेच मुलास थापड बुक्क्याने मारहाण केली. याप्रकरणी पीडित बालकाच्या मातेच्या फिर्यादीवरुन हट्टा पोलीस ठाण्यात १८ मार्च रोजी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमालकाविरोधात भादंवि कलम ३७७, ५०६, ३२३ सह कलम ६७ बी आयटी ३, ४, ८, पोक्सो कायदा व १४ (१) बाल कामगार अधिनियम या कलमानुसार आरोपी औंढेवाला मौलाना हॉटेलवाला याच्याविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे करत आहेत. जवळा बाजार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांनी घटनेची नोंद घेतली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title:  Unnatural oppression on the child