वसमत-कवठा मार्गावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात; एकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2023 18:39 IST2023-03-25T18:38:36+5:302023-03-25T18:39:26+5:30

वसमत-कवठा मार्गावर आज दुपारी झाला अपघात

Two-wheelers face-to-face accident on Wasmat-Kavatha road; death of one | वसमत-कवठा मार्गावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात; एकाचा मृत्यू 

वसमत-कवठा मार्गावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात; एकाचा मृत्यू 

वसमत: दोन दुचाकींची आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास कवठा मार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. गंभीर जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. 

वसमत-कवठा मार्गावर आज दुपारी कुरुंद्याकडुन वसमतला व वसमत कडुन कुरुंद्याकडे दोन दुचाकी जात होत्या. एका पेट्रोल पंपाजवळ दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या. यात दुचाकीवरील योगेश सुभाष पाष्टे (३३, रा कुरुंदा) आणि शेख शाहरुख शेख चॉंद (३०,रा कुरुंदवाडी) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, गंभीर जखमी दोघांना अधिक उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले. मात्र, योगेश पाष्टेचा वाटेतच मृत्यू झाला. माहिती मिळताच शहर पोलीसांनी अपघातस्थळी धाव घेतली. 

Web Title: Two-wheelers face-to-face accident on Wasmat-Kavatha road; death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.