दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, हिंगोली शहरातील घटना; लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक
By रमेश वाबळे | Updated: February 26, 2023 23:03 IST2023-02-26T23:02:13+5:302023-02-26T23:03:27+5:30
या आगीत दुकानातील लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात येत होता.

दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, हिंगोली शहरातील घटना; लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक
रमेश वाबळे, हिंगोली : शहरातील महात्मा गांधी चौकातील प्रिटिंग प्रेस व संगणक विक्रीच्या दुकानाला आग लागल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास घडली. या आगीत दुकानातील लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात येत होता.
तीन- चार दिवसांपासून उन्हाची प्रखरता अधिक जाणवू लागली आहे. प्रखर उन्हामुळे सन्नाटा पहायला मिळत आहे. व्यापारीही दुपारच्या वेळेला सावलीचा आधार घेत ग्राहकांची वाट पाहत आहेत. यातच रविवारी दुपारी ४.३० च्या सुमारास महात्मा गांधी चौकातील ओमप्रकाश मोतीलाल अग्रवाल व विजय मोतीलाल अग्रवाल यांचे हिंद प्रिटिंग प्रेस व ओरियन काॅम्प्यूटर या दुकानांना आग लागल्याची घटना घडली.
पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले होते. दुकानदातून धुराचे लोट बाहेर येत होते. दरम्यान, परिसरातील व्यापाऱ्यांनी घटनेची माहिती नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. यानंतर काही वेळातच हिंगोली अग्निशमनच्या दोन गाड्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचल्या.
आग भडकत असल्याचे पाहून सेनगाव व कळमनुरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. त्यानंतर तेथील दोन गाड्या तसेच इतर खासगी चार टॅंकर आग अटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.
दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, हिंगोली शहरातील घटना; लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक.#hingolihttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/7lG5XK3W2X
— Lokmat (@lokmat) February 26, 2023
दरम्यान, जवळपास दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आग अटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत दोन्ही दुकानाचे लाखों रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात येत होता. घटनेप्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"