कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 10:46 PM2022-05-15T22:46:46+5:302022-05-15T22:47:35+5:30

हिंगोलीतील काम आटोपून सायंकाळी तिघेही दुचाकीवरून गावाकडे निघाले होते.

Two killed in car crash; One seriously injured | कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

Next

हिंगोली : भरधाव कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना हिंगोली तालुक्यातील राहोली परिसरात १४ मे रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर गजानन वाघमारे, विवेक उत्तम भडके अशी मृतांची नावे आहेत. सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील ज्ञानेश्वर गजानन वाघमारे, विवेक उत्तम भडके, अर्जुन मदन भडके हे तिघे १४ मे रोजी दुचाकीवरून हिंगोली येथे आले होते.

हिंगोलीतील काम आटोपून सायंकाळी तिघेही दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. त्यांची दुचाकी हिंगोली तालुक्यातील राहोली परिसरात आली असता सेनगावकडून हिंगोलीकडे येणाऱ्या भरधाव कारची दुचाकीला जोराची धडक बसली. यात ज्ञानेश्वर वाघमारे व विवेक भडके यांचा जागेवरच मृत्यू झाला; तर अर्जून भडके हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एन. मळघणे, जमादार गजानन पोकळे, नंदू जाधव, शेख महमंद, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी अर्जुन भडके यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय दवाखान्यात दाखल केले. दरम्यान, या अपघातात कारचालकही जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

 

Web Title: Two killed in car crash; One seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.