जिल्ह्यात आत्महत्येच्या दोन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:52 IST2018-06-15T23:52:39+5:302018-06-15T23:52:39+5:30

सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

 Two cases of suicide in the district | जिल्ह्यात आत्महत्येच्या दोन घटना

जिल्ह्यात आत्महत्येच्या दोन घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
मयत महिलेचे नाव वंदना श्यामराव डुकरे (३६, रा. आमदारी, ता. औढा नागनाथ) असे आहे. तिचा पती श्यामराव याने माहेरहून आॅटो घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून मागील दोन वर्षांपासून सतत शारीरिक व मानसिक छळ केला. यास कंटाळून वंदनाने राहत्या घरी १४ जून रोजी विषारी द्रव घेतले. तिला उपचारासाठी हिंगोली येथे दाखल केले असता १५ जून रोजी सकाळी ४.३० वाजता निधन झाले. श्रीरंग कºहाळे यांच्या फिर्यादीवरून श्यामराव श्रीपती डुकरेविरुद्ध ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल केले. तपास सपोनि सुधाकर आडे करीत आहेत.
युवकाची आत्महत्या
सेनगाव : शहरातील इंदिरानगर भागातील सचिन रमेश गाढवे (२७) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
सेनगाव पोलीस ठाण्यानजीक इंदिरानगर येथील सचिन रमेश गाढवे या युवकाने १४ जूनच्या रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी निदर्शनास आला. आत्महत्येचे निश्चित कारण स्पष्ट होऊ शकले नाही. अनिल गाढवे यांच्या माहितीवरून सेनगाव पोलिसांत घटनेची नोंद झाली.
महिलेचा विनयभंग
सेनगाव : तालुक्यातील सुकळी खु येथे एका २३ वर्षीय महिलेचा वाईट हेतूने हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीचे नाव आरोपी सतीश पाडुरंग खिल्लारी आहे. १४ जून सायंकाळी पाच वाजता सदर महिलेच्या घरात अनधिकृत प्रवेश करून वाईट हेतूने हात पकडला. सदर महिलेच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर भोरे हे करीत आहे.

Web Title:  Two cases of suicide in the district