शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

हळदीला भाववाढीची चमक; हिंगोली मार्केट यार्डात ३२०० क्विंटलची आवक

By रमेश वाबळे | Updated: January 29, 2024 19:02 IST

सोयाबीनची घसरगुंडी सुरूच; तुरीला समाधानकारक भाव मात्र उत्पादन निम्म्याखाली

हिंगोली : येथील मार्केट यार्डात सरासरी दहा हजारांवर पोहोचलेल्या हळदीला २९ जानेवारी रोजी भाववाढीची चमक मिळाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे जवळपास एक ते दीड हजाराने भाववाढ झाली. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सोयाबीनच्या दरात मात्र सुरू असलेल्या घसरगुंडीमुळे शेतकऱ्यांत निराशा पसरली आहे, तर तुरीलाही यंदा समाधानकारक भाव आहे. मात्र, उत्पादन नसल्याने भाववाढीचा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हिंगोली बाजार समितीच्या मार्केट यार्डात ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान हळदीने १५ हजारांचा पल्ला गाठला होता. मागील काही वर्षांतून उच्चांकी भाव मिळाल्याने मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात हळद विक्री केली. परंतु, आणखी भाववाढ होईल अशी आशा असलेल्या शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली. परंतु, भाव वाढण्याऐवजी घसरण सुरू झाली. ऑक्टोबरच्या शेवटी घसरलेले भाव नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कायम होते. पडत्या भावामुळे मार्केट यार्डातील आवक मंदावली होती. जवळपास एक हजाराच्या खाली आवक होत असताना २४ जानेवारी रोजी एक ते दीड हजाराने दर वधारले, तर २९ जानेवारी रोजीही कमाल ११ हजार ते किमान १३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलने हळदीची विक्री झाली. भावात वाढ झाल्याने आवकही वाढली असून, या दिवशी ३ हजार २०० क्विंटलची आवक झाली होती.

तर, यंदा सोयाबीनची परिस्थिती वाईट असून, शेतकऱ्यांना पडत्या भावात विक्री करावी लागत आहे. तुरीला समाधानकारक भाव मिळत असला तरी उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूर शिल्लक नसल्याचे चित्र आहे.

सोयाबीनची घसरगुंडी; उत्पादक रडकुंडी...मागील दोन वर्षांपासून सोयाबीनला समाधानकारक दर मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी पडत्या भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले होते. परंतु, वर्षभरही भाव वाढला नाही. यंदाचे नवीन सोयाबीन आल्यावर तरी भाव वाढतील, अशी आशा होती. मात्र, भाव वाढण्याऐवजी घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांना जुने आणि नवे सोयाबीन पडत्या दरात विक्री करावे लागले. यातून अनेक शेतकऱ्यांना लागवडही वसूल झाला नाही. आता ज्या शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन विक्रीविना ठेवले, परंतु भाव वाढण्याऐवजी घसरल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.

तुरीला भाव; पण शेतकऱ्यांना लाभ नाही...यंदा तुरीला दहा हजारांवर भाव मिळत आहे. परंतु, पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव आणि अवकाळीच्या फटक्यामुळे उत्पादन निम्म्याखाली आले. काही शेतकऱ्यांना तर यंदा तुरीची काढणीही परवडली नाही. त्यामुळे बाजारात भाव जरी समाधानकारक मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूर नाही. त्यामुळे या भाववाढीचा लाभ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र