जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:34 IST2019-01-04T00:34:14+5:302019-01-04T00:34:29+5:30
ट्रकमध्ये कोंबून निर्दयपणे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी हिंगोली शहरातील नांदेड नाका येथे बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास पकडला. ट्रकमध्ये जवळपास ५० गुरे होती. चालक मात्र ट्रक सोडून फरार झाला आहे.

जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ट्रकमध्ये कोंबून निर्दयपणे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी हिंगोली शहरातील नांदेड नाका येथे बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास पकडला. ट्रकमध्ये जवळपास ५० गुरे होती. चालक मात्र ट्रक सोडून फरार झाला आहे.
हिंगोली शहरातील नांदेड नाका येथून गुरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी रात्री १ वाजेच्या सुमारास पकडला. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी सेनगाव येथून येत असताना त्यांना गुरे घेऊन जाणार उभा ट्रक आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता, ट्रकमध्ये निर्दयीपणे गुरे कोंबल्याचे निदर्शनास आले. ट्रकमध्ये गुदमरून एका जनावराचा मृत्यूही झाला. नागरिकांच्या मदतीने जनावरांना ट्रकबाहेर काढण्यात आले. जनावरांना चारापाणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
सदर ट्रक हिंगोली शहर ठाण्यात उभा करण्यात आला आहे. याप्रकरणी ३ जानेवारी रोजी उशिरापर्यंत आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती.
दारूसाठा जप्त
हिंगोली : पोलिसांनी बुधवारी दोन ठिकाणी छापे मारून देशी अवैध दारूसाठा जप्त केला. लिटर अवैध दारूसाठा जप्त केला. पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी मोहीम राबवून अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. बुधवारी पोलिसांनी वसमत तालुक्यातील हट्टा ठाणे हद्दीत एका ठिकाणी कारवाई करून २ हजार २४० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला.