A tragic accident on Aundha-Jintur road; The car crashed off the bridge | औंढा-जिंतूर रोडवर भीषण अपघात; पुलावरुन कोसळली कार

औंढा-जिंतूर रोडवर भीषण अपघात; पुलावरुन कोसळली कार

औंढा नागनाथ ( हिंगोली ) : औंढा- जिंतूर महामार्गावरील धार माथा गावाजवळ असलेल्या पूर्णा नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. कारमधील 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी 12 वाजेच्या सुमारास घडली. गाडी पुलावरुन खाली पडल्याने गाडीचा चुराडा झाला आहे. चारही जखमी बीड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: A tragic accident on Aundha-Jintur road; The car crashed off the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.