थरारक ! गळ्यात आधारकार्ड लटकवित महिलेने धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 18:50 IST2022-02-05T18:50:25+5:302022-02-05T18:50:29+5:30
महिलेने आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकले नाही.

थरारक ! गळ्यात आधारकार्ड लटकवित महिलेने धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
वसमत : रेल्वेस्टेशन भागातील कर्मचारी वसाहात परिसरात २७ वर्षीय महिलेने गळ्यात आधारकार्ड लटकवित अकोला -पुर्णा पॅसेंजर रेल्वेसमोर शनिवारी पहाटे उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत शहरातील रेल्वे कर्मचारी वसाहात परिसरात ५ फेब्रुवारी शनिवार रोजी पाहटे अकोला- पुर्णा पॅसेंजर रेल्वेसमोर वैशाली स्वप्नील दाढे वय २७, रा. तथागत नगर सोनखेड ता. पुर्णा जि. परभणी या महिलेने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली.
महिलेच्या गळ्यात आधारकार्ड घातलेले होते. प्रेतावर वसमत उपजिल्हा रुग्णालयात श्वविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रेल्वे पोलीस पूर्णा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास पोलीस करत होते. महिलेने आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकले नाही.