जमिनीच्या वादातून तिघांना विषारी द्रव्य पाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:49 IST2019-02-23T18:47:54+5:302019-02-23T18:49:27+5:30

जमिनीच्या वादातून विषारी द्रव्य पाजले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

three people suffers poison case in land dispute | जमिनीच्या वादातून तिघांना विषारी द्रव्य पाजले

जमिनीच्या वादातून तिघांना विषारी द्रव्य पाजले

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील तिघांना विष बाधा झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांना जमिनीच्या वादातून विषारी द्रव्य पाजले असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

पुसेगाव येथे सय्यद रफिक स. मुशीर (३५), नस्तईन बी स. रफिक (४०) व बीबीबेगम सय्यद मुशीर (६०) यांचा काही जणांसोबत जमिनीचा वाद सुरु आहे. यांना आज हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या जमिनीवर अवैध कब्जा केलेल्या लोकांनी त्यांना विषारी द्रव्य पाजल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. ते शुद्धीवर आल्यानंतर खरा प्रकार समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Web Title: three people suffers poison case in land dispute