चोरट्यांनी फायनान्स कंपनीची रोकडने भरलेली १ क्विंटल वजनाची तिजोरीच केली लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 11:43 IST2022-04-12T11:42:15+5:302022-04-12T11:43:40+5:30

शनिवार व रविवारची सुट्टी असल्यामुळे वसुलीची जमा झालेली रक्कम या तिजोरीत होती.

Thieves looted 1 quintal of finance company's safe in Hingoli | चोरट्यांनी फायनान्स कंपनीची रोकडने भरलेली १ क्विंटल वजनाची तिजोरीच केली लंपास

चोरट्यांनी फायनान्स कंपनीची रोकडने भरलेली १ क्विंटल वजनाची तिजोरीच केली लंपास

कळमनुरी (जि. हिंगोली): शहरातील विकासनगर येथील स्पंदन खासगी फायनान्स कंपनीची तिजोरीच चोरट्यानी चोरून नेली. ही घटना १० एप्रिलच्या मध्यरात्री घडली.

शहरातील विकासनगर येथे स्पंदन खासगी फायनान्सचे कार्यालय उघडण्यात आले आहे. चोरट्यांनी या कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथील १ क्विंटल ८० किलो वजन असलेली पैशाची तिजोरीची उचलून नेली. या तिजोरीत ९ लाख ३९ हजार रुपये होते. शनिवार व रविवारची सुट्टी असल्यामुळे वसुलीची जमा झालेली रक्कम या तिजोरीत होती. चोरट्यांनी ही तिजोरीच पळविली.

फायनान्स कंपनीने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक निकाळजे, उदय खंडेराय, सपोनि श्रीनिवास रोयलावार, शिवसांब घेवारे, फौजदार सिद्दिकी आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. चोरट्यांचा माग लागावा यासाठी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Thieves looted 1 quintal of finance company's safe in Hingoli