घराचे कुलुप तोडून दिडलाखांचा ऐवज लंपास; हिंगोलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 14:33 IST2017-12-12T14:29:44+5:302017-12-12T14:33:26+5:30
नाईकनगर भागातील चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील सोने-चांदीचे दागिणे व मोबाईल असा एकूण १ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी ११ डिसेंबर रोजी रात्री उशिराने हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराचे कुलुप तोडून दिडलाखांचा ऐवज लंपास; हिंगोलीतील घटना
हिंगोली : नाईकनगर भागातील चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील सोने-चांदीचे दागिणे व मोबाईल असा एकूण १ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी ११ डिसेंबर रोजी रात्री उशिराने हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील नाईकनगर येथील जयदेव जवाहरलाल गांगजी हे कुटुंबियासमवेत त्यांच्या भावाच्या लग्न सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कुलुप तोडून दिडलाखांचा ऐवज लंपास केला. घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलुप तोडलेल्या अवस्थेत दिसले. आत प्रवेश करताच घरात चोरी झाल्याचे गांगजी यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी हिंगोली शहर ठाण्याचे पोनि अशोक मैराळ, फौजदार तानाजी चेरले यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.