सेनगाव येथील बालाजी मंदिरात भरदिवसा चोरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 16:55 IST2018-02-21T16:50:29+5:302018-02-21T16:55:35+5:30

आठवडी बाजाराजवळ असलेल्या बालाजी मंदिरात आज सकाळी १०.३० चा सुमारास चोरी झाली. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे दागिने लपांस केले आहेत. 

theft in Balaji temple at Sengaon | सेनगाव येथील बालाजी मंदिरात भरदिवसा चोरी 

सेनगाव येथील बालाजी मंदिरात भरदिवसा चोरी 

सेनगाव ( हिंगोली ): आठवडी बाजाराजवळ असलेल्या बालाजी मंदिरात आज सकाळी १०.३० चा सुमारास चोरी झाली. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे दागिने लपांस केले आहेत. 

शहरातील आजेगाव रस्त्यावरील आठवडी बाजाराजवळ असलेल्या बालाजी मंदिरात आज सकाळी १० .३०चा सुमारास मंदिरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मूर्तीवरील दागिन्यांवर डल्ला मारला. हा प्रकार दुपारी बाराच्या सुमारास पुजाऱ्याचा लक्षात आला. यानंतर मंदिर समितीचे अध्यक्ष योगेश तोष्णीवाल यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर ,फौजदार किशोर पोटे यांनी भेट घटनास्थळी भेट दिली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

गेल्या वर्षी येथील महावीर दिगंबर जैन मंदिरातुन प्राचीन मूर्तीची चोरी झाली होती. या घटनेचा अद्याप शोध लागला नाही. यातच आज बालाजी मंदिरात चोरी झाली. नागरिकांनी या घटनेचा निषेध केला असून चोरीचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी केली आहे.

Web Title: theft in Balaji temple at Sengaon