शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

३ लाखांच्या शेतीमालाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:00 IST

कळमनुरी तालुक्यातील चूंचा येथील एका आखाड्यावरील शटर वाकवून हळद आणि सोयाबीनचा अंदाजे तीन लाखांच्यावर माल चोरून नेला असल्याची घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील चूंचा येथील एका आखाड्यावरील शटर वाकवून हळद आणि सोयाबीनचा अंदाजे तीन लाखांच्यावर माल चोरून नेला असल्याची घटना घडली आहे.वारंगा फाटा ते हदगाव या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चुंचा ता. कळमनुरी येथील शेतकरी साईप्रसाद दिलीपराव देशमुख यांच्या शेतातील शेड मधील शटर वाकवुन ४ जून २०१८ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शटरमधील ६० सुती कट्टे ढोल केलेली हळद व २५ सुती कटे सोयाबीन चोरी गेले असल्याची घटना घडली आहे. ६० कट्टे हळदीचे किमान ६० किलो प्रतिकट्टा याप्रमाणे ३६ क्विंटल तर सोयाबीनचे २५ कट्ट्याचे अंदाजे १५ क्विंटल एवढा माल चोरट्यांनी चोरून नेला आहे. हळद व सोयाबीनचा मिळून अंदाजे ३ लाखांच्या वर माल चोरी झाला आहे. सोयाबीन हे शेतात पेरणीसाठी घरगुती बियाणे म्हणून वापरण्यासाठी शेतात नेऊन ठेवले होते असे शेतकऱ्याने सांगितले.सदरील घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले आणि वारंगा फाटा येथील बीट प्रमुख अशोक कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या चोरी प्रकरणी तपासाकरिता श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले होते मात्र पाऊस पडला आणि अनेकांनी येथे येऊन पाहून गेल्याने श्वान माग काढू शकले नाही. दरम्यान मागील काही दिवसांपासून वारंगा फाटा व परिसरात हळद चोरीच्या घटना वाढत असतांना आखाडा बाळापूर पोलीसांना मात्र हे एक मोठे आव्हानच आहे. सदरील घटनेचा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा