महिला शॉपिंगसाठी थांबली, चोरट्यांनी बॅगला ब्लेड मारून ५० हजार पळविले

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: April 12, 2023 19:40 IST2023-04-12T19:38:13+5:302023-04-12T19:40:13+5:30

चोरट्यांनी बॅगमधील पासबूकही लंपास केले.

The woman stopped for shopping, the thieves cut the bag with a blade and ran away with 50,000 | महिला शॉपिंगसाठी थांबली, चोरट्यांनी बॅगला ब्लेड मारून ५० हजार पळविले

महिला शॉपिंगसाठी थांबली, चोरट्यांनी बॅगला ब्लेड मारून ५० हजार पळविले

हिंगोली : एका महिलेजवळील बॅगला ब्लेड मारून ५० हजारांची रक्कम व पासबूक चोरट्यांनी पळविले. ही घटना हिंगोली शहरात बुधवारी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास घडली.

हिंगोली शहरातील तिरूपती नगरातील प्रमिला पांडुरंग मावळे या १२ एप्रिल रोजी दुपारी बँकेतून पैसे काढण्यासाठी बाजारपेठेत आल्या होत्या. त्यांनी एसबीआय बँकेतून ५० हजार रूपये काढून बॅगमध्ये ठेवले होते. त्यात पासबूकही ठेवले. त्यानंतर त्या पिपल्स बँक ते जैन मंदिर परिसरातील एका कटलरी दुकानावर दुपारी १२.४५ वाजता आल्या असता त्यांच्या बॅगला ब्लेड मारून त्यातील ५० हजार रूपये चोरट्याने लंपास केल्याचे उघडकीस आले. 

चोरट्यांनी बॅगमधील पासबूकही लंपास केले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी प्रमिला मावळे यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस अंमलदार शेख मुजीब तपास करीत आहेत.
 

Web Title: The woman stopped for shopping, the thieves cut the bag with a blade and ran away with 50,000