हिंगोलीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2023 20:22 IST2023-02-14T20:21:21+5:302023-02-14T20:22:06+5:30
हिंगोलीत गळफास घेऊन महिलेने आपले जीवन संपवले.

हिंगोलीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या
हिंगोली : येथील रिसाला बाजार भागातील श्रीनगरात २८ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली. नाजमीन निखत बी सय्यद इम्रान (रा. श्रीनगर, रिसाला बाजार हिंगोली ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
कोणत्यातरी कारणावरून घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक आम्ले, उपनिरीक्षक अशोक कांबळे आदींनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. याप्रकरणी सय्यद इम्रान सय्यद गफुर यांच्या खबरीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे तपास करीत आहेत.